Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Goa Taxi Aggregator: टॅक्‍सी ॲग्रीगेटर धोरण स्‍थानिक टॅक्‍सी मालकांवर बळजबरीने लादण्‍यात येणार नाही. यासंदर्भातील केवळ मसुदा जारी करण्‍यात आला आहे.
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: टॅक्‍सी ॲग्रीगेटर धोरण स्‍थानिक टॅक्‍सी मालकांवर बळजबरीने लादण्‍यात येणार नाही. यासंदर्भातील केवळ मसुदा जारी करण्‍यात आला आहे. त्‍यावर सरकारकडे सुमारे ३,५०० सूचना, हरकती आलेल्‍या आहेत.

त्‍यांचा विचार करून आणि टॅक्‍सी मालकांशी चर्चा करूनच आवश्‍‍यक ते बदल करून या धोरणाची अंमलबजावणी करण्‍यात येईल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी गुरुवारी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

गोवा पर्यटन राज्‍य आहे. दरवर्षी देशी–विदेशी मिळून कोट्यवधी पर्यटक राज्‍याला भेट असतात. पर्यटनाला चालना देण्‍यात टॅक्‍सी सेवेची भूमिका महत्त्‍वपूर्ण असते. त्‍यामुळे या व्‍यवसायात पारदर्शकता येणे आवश्‍‍यक आहे.

Mauvin Godinho
Goa Taxi: 'आमच्या पोटावर पाय दिला जातोय'! काणकोणात टॅक्सी व्यावसायिक एकवटले; ‘गोवा माईल्स’विरोधात नगराध्यक्षांना निवेदन

गेल्‍या काही वर्षांत राज्‍यातील टॅक्‍सी व्‍यवस्‍थेबाबत पर्यटकांकडून प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित होत आहे. त्‍यामुळे गोव्‍याचीही बदनामी होत आहे. त्‍यामुळेच सरकारने ॲग्रीगेटर धोरणाचा निर्णय घेतला. त्‍यासाठी जारी केलेल्‍या मसुद्यावर सरकारकडे सुमारे ३,५०० सूचना आणि हरकती आलेल्‍या आहेत.

Mauvin Godinho
Mopa Taxi Parking Rate: ..अन्‍यथा कुटुंबांसहित आंदोलन करु! टॅक्‍सीचालक संतप्त; मोपावरील वाढीव पार्किंग शुल्क मागे घेण्याची मागणी

मुख्‍यमंत्र्यांनीही दिली आहे हमी!

स्‍थानिक टॅक्‍सी मालकांना सरकारला अजिबात दुखवायचे नाही. त्‍यांच्‍याशी चर्चा करून आणि त्‍यांची मते विचारात घेऊनच टॅक्‍सी ॲग्रीगेटर धोरणाची राज्‍यात अंमलबजावणी करण्‍यात येईल, अशी हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आधीच दिलेली आहे, असेही मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com