Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Goa Tourism Season 2025: 2 ऑक्टोबरपासून रशियातील नोवोसिबिर्स्क (Novosibirsk) येथून तीन नवीन साप्ताहिक चार्टर्ड विमानांची सेवा मोपा विमानतळावर सुरु होणार आहे.
Goa Tourism Season
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील पर्यटन उद्योग आगामी 2025-26 च्या पर्यटन हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले जात असून, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (MOPA) येथे लवकरच रशिया आणि मध्य आशियातून येणाऱ्या चार्टर्ड विमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

रशियाहून दर आठवड्याला 9 विमानांचे आगमन

दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून रशियातील नोवोसिबिर्स्क (Novosibirsk) येथून तीन नवीन साप्ताहिक चार्टर्ड विमानांची सेवा मोपा विमानतळावर सुरु होणार आहे. या नवीन विमानांच्या आगमनामुळे रशियातून गोव्यात येणाऱ्या विमानांची एकूण संख्या साप्ताहिक 9 पर्यंत पोहोचणार आहे. यापूर्वीच रशियाची एअरोफ्लोट (Aeroflot) कंपनी येकातेरिनबर्ग (Ekaterinburg) आणि मॉस्को (Moscow) येथून सध्या नियमित सेवा देत आहे.

Goa Tourism Season
Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

या नवीन विमानसेवांना मिळालेला प्रतिसाद आणि वाढलेले बुकिंग पाहता, आगामी पर्यटन हंगाम नोवोसिबिर्स्क आणि रशियाच्या इतर शहरांतील पर्यटकांना गोव्याकडे (Goa) आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषत: मोपा विमानतळाला आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमानांसाठी पहिली पसंती मिळत असल्याचे यावरुन स्पष्ट होते.

कझाकस्तानमधूनही चार्टर्ड सेवा सुरु

रशियाव्यतिरिक्त (Russia) मध्य आशियाई देशांमधूनही पर्यटकांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आहेत. कझाकस्तान येथून चार्टर्ड विमानांची सेवा 25 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. यामुळे गोवा पर्यटन क्षेत्राची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अधिक मजबूत होणार आहे. युरोप आणि रशियातील थंडीच्या हंगामात पर्यटक उष्ण कटिबंधातील गोव्याला प्राधान्य देतात, या पार्श्वभूमीवर ही वाढलेली विमानसेवा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Goa Tourism Season
Mhadei Tiger Reserve: गोवा मुक्तीनंतर पर्यटन व्यवसाय जसा बेशिस्तीने विस्तारत गेला, तोच कित्ता जंगलांत राबवला जात आहे..

एकंदरीत, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमानांची वाढलेली संख्या आणि कझाकस्तानसारख्या नव्या बाजारपेठांचा समावेश यामुळे गोवा पर्यटन हंगाम 2025-26 हा भरभराटीचा आणि यशस्वी होईल, असा विश्वास पर्यटन उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com