British Prime Minister Boris Johnson Dainik Gomantak
देश

"मी स्वतःला सचिन तेंडुलकर अन् अमिताभ बच्चन समजतो ...:" पंतप्रधान बोरिस जॉन्सन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British Prime Minister Boris Johnson) दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल आभार मानले. पंतप्रधान मोदींना आपला खास मित्र म्हणून संबोधित करताना ते म्हणाले, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि भारतातील जनतेने भव्य स्वागत केल्याबद्दल आभार मानतो. माझ्या आगमनानंतर ज्या प्रकारे माझे स्वागत करण्यात आले ते पाहून मी स्वतःला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) समजतो."

दरम्यान, जॉन्सन यांनी आपल्या भारत भेटीबाबत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेची माहिती पत्रकारांना दिली. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान जॉन्सन यांचे अहमदाबादमध्ये स्वागत केले. गुजरातमध्ये आपण केलेल्या स्वागतामुळे खूप आनंद झाला असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले. जॉन्सन पुढे म्हणाले की, ''जणू मी सचिन आणि अमिताभ आहे. अहमदाबाद शहरातील रस्त्यांवर लावण्यात आलेले पोस्टर्स पाहून मी भारावून गेलो होतो.''

तसेच, शुक्रवारी त्यांनी यूके आणि भारताच्या धोरणात्मक संरक्षण, राजनैतिक आणि आर्थिक भागीदारीवर सखोल चर्चा केली, ज्याचा उद्देश इंडो-पॅसिफिकमध्ये भागीदारी आणि सुरक्षा सहकार्य वाढवणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT