ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारतात "शानदार स्वागत" केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Prime Minister Narendra Modi) आभार मानले. आमची भारत भेट ही दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण यूके-भारत संबंधांमध्ये आताच्याइतके चांगले संबंध नव्हते, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. इतके अप्रतिम रिसेप्शन मी पाहिलेले नाही असेही ते म्हणाले. जगात आमचे असे स्वागत पुन्हा होईल असे वाटत नसल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे. (British Prime Minister Boris Johnson is on a visit to India)
दरम्यान, इंडो-पॅसिफिक प्रदेशात भागीदारी आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटन आणि भारताच्या धोरणात्मक संरक्षण, राजनैतिक आणि आर्थिक भागीदारीवर सखोल चर्चा करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
तसेच, ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार आहेत. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही बाजूंकडून प्रेस निवेदन जारी करण्यात आली. पंतप्रधान जॉन्सन (British Prime Minister Boris Johnson) यांचे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर गुरुवारी गुजरातमध्ये आगमन झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.