Crime News   Dainik Gomantak
देश

Hyderabad Murder Case: हैदराबाद हादरलं! पार्टनरचं शीर कापलं, पाय फ्रीजमध्ये लपवले; श्रद्धा वालकरसारखं...

Another Murder Like Shraddha Walker: देशातील हायटेक सिटी हैदराबादमधून श्रद्धा खून प्रकरणासारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

Manish Jadhav

Another Murder Like Shraddha Walker: देशातील हायटेक सिटी हैदराबादमधून श्रद्धा खून प्रकरणासारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाप्रमाणेच हैदराबाद येथील आरोपीने ही घटना घडवून आणली आहे.

बी चंद्रमोहन असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 48 वर्षे आहे. तर, मृत महिला 55 ​​वर्षांची आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीने 12 मे रोजी हा जघन्य गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मृत व्यक्तीकडून 7 लाख रुपये घेतले होते. पीडितेने त्याच्याकडे या पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ सुरु केली.

पीडिता आरोपींवर पैशांसाठी दबाव टाकत होती. त्यामुळे चंद्रमोहनला खूप राग आला.

आरोपीचे या महिलेशी पूर्वीपासून संबंध होते. चंद्रमोहनला पीडितेने तिच्याच घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी जागा दिली होती.

12 मे रोजी आरोपीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, पीडितेवर चाकूने अनेक वेळा हल्ला करण्यात आला होता.

अशाप्रकारे या घटनेचा छडा लावण्यात आला

चाकू हल्ला इतका जीवघेणा होता की, महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चंद्रमोहनने मृत महिलेच्या मृतदेहाचे 22 तुकडे केले.

तपासात आरोपीच्या घरातून दगड कापण्याचे हत्यार सापडले. चंद्रमोहनने मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीजमध्ये लपवले. तर, डोके डम्पिंगच्या ठिकाणी फेकले होते.

15 मे रोजी आरोपीने मृत महिलेचा शिरच्छेद केला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना फोन करुन ती जिवंत असल्याची खात्री दिली होती.

दिल्लीतही (Delhi) अशीच एक घटना समोर आली होती, ज्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आफताबने त्याची गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन जंगलात फेकून दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

SCROLL FOR NEXT