Delhi Crime News Dainik Gomantak
देश

Delhi News: 'पती रात्री पॉर्न स्टारसारखे कपडे घालण्यास भाग पाडतो...,' महिलेचा धक्कादायक खुलासा

Delhi Crime News: पती रात्री पॉर्न स्टारसारखे कपडे घालण्यास भाग पाडत असल्याने पत्नीने पोलीस ठाणे गाठले. याबाबत 30 वर्षीय पत्नीने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Manish Jadhav

Delhi Crime News: देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती रात्री पॉर्न स्टारसारखे कपडे घालण्यास भाग पाडत असल्याने पत्नीने पोलीस ठाणे गाठले.

याबाबत 30 वर्षीय पत्नीने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पतीला पॉर्न फिल्म पाहण्याचे व्यसन होते, असेही पत्नीने पोलिसांना सांगितले. याबाबत पती तिला पॉर्न स्टार सारखे कपडे घालण्यास सांगतो आणि छळ करतो.

दरम्यान, पती-पत्नीमधील हे प्रकरण दिल्लीच्या पूर्व रोहताश नगर भागातील आहे. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, दोघांनी 2020 मध्ये लग्न केले. पोलिसांनी पुढे सांगितले की, महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबावर हुंडा मागितल्याचा आरोपही केला आहे.

यासोबतच तिचा पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे महिलेने (Women) पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी आरोपांचा तपास सुरु केला

या प्रकरणाची अधिक माहिती देताना शाहदराचे उपायुक्त रोहित मीना यांनी सांगितले की, पोलिसांनी पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध कलम 498A, 406, 377 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

खून केल्यानंतर मृतदेह झाडीत फेकून दिला

दुसरीकडे, दिल्लीतील (Delhi) सराई रोहिल्ला परिसरात तरुणाची बेदम मारहाण करुन मृतदेह झाडीत फेकून देण्यात आला. पोलिसांनी मृतदेह झाडीतून ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी पोलीस अज्ञात लोकांविरुद्ध खुनाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT