Delhi Crime: दिल्लीतील त्यागराज स्टेडियमजवळील एका उद्यानात हवाई दलाच्या जवानाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी उद्यानात मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला.
याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. अखिलेश्वर मिश्रा (38) असे या मृतदेहाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. अखिलेश्वर एअरफोर्स स्टेशनवर तैनात होते. त्यांनी आत्महत्या (Suicide) कोणत्या कारणासाठी केली याचा तपास सुरु आहे.
दरम्यान, दक्षिण दिल्लीतील त्यागराज स्टेडियमजवळील एका उद्यानात अखिलेश्वर मिश्रा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. अखिलेश्वर हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी होते.
अखिलेश्व यांच्याजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्याची चौकशी सुरु आहे. सुसाइड नोटमध्ये अखिलेश्वर मिश्रा यांनी लिहिले की, “मला कोणत्याही प्रकारची वैयक्तिक समस्या नव्हती. परंतु मी या जगात 'फिट' बसू शकत नाही.''
पोलिसांनी सांगितले की, सुसाईड नोटमध्ये अखिलेश्वर मिश्रा यांनी अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक झाल्याचा उल्लेख केला आहे.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आता हा अनोळखी व्यक्ती कोण आहे, त्यामुळे अखिलेश्वर मिश्रा नाराज होते, त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेतली जात आहे. अखिलेश्वर मिश्रा यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
पोलिस उपायुक्त (दक्षिण) चंदन चौधरी म्हणाले की, “आमचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यागराज स्टेडियमच्या सात क्रमांकाच्या गेटसमोर पार्कमध्ये अखिलेश्वर मिश्रा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
यावेळी मिश्रा यांच्या कुटुंबीयांना तात्काळ बोलावण्यात आले. चौकशीत कुटुंबीयांनी सांगितले की, 'अखिलेश्वर रात्री उशिरा उद्यानात एकटाच गेला होता. तो घरातून कधी निघून गेला हे आम्हाला कळू शकले नाही.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.