PM Shram Yojana government scheme Dainik Gomantak
देश

PM Shram Yojana या सरकारी योजनेत 2 रुपये जमा करुन कसे मिळणार 36000 रुपये

PM Shram Yojana या अंतर्गत, रस्त्यावरचे विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचे वृद्धत्व सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: प्रधानमंत्री श्रम योगी मन धन योजना (PM Shram Yogi Man Dhan Yojna) ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अतिशय प्रभावी योजना आहे. या अंतर्गत, रस्त्यावरचे विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचे वृद्धत्व सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल. या योजनेअंतर्गत सरकार या कामगारांना पेन्शनची हमी देते. या योजनेमध्ये तुम्ही दररोज फक्त 2 रुपये टाकायचे आणि त्या बदल्यात तुम्हाला 36000 रुपये पेन्शन मिळवू शकते.

55 रुपये दरमहा जमा करावे लागतात

ही योजना सुरू केल्यावर तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, वयाच्या 18 व्या वर्षापासून दररोज सुमारे 2 रुपयांची बचत करून, तुम्हाला 36000 रुपये वार्षिक पेन्शन मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तेव्हा तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. 60 वर्षांनंतर, तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल म्हणजेच 36000 रुपये प्रति वर्ष.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

येथे केली जाईल नोंदणी

यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावून योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. कामगार CSC केंद्रातील पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात. या योजनेसाठी सरकारने एक वेब पोर्टल तयार केले आहे. या वेब पोर्टल द्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल. नोंदणीसाठी, तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर लागेल. याशिवाय, संमतीपत्र द्यावे लागेल जे बँक शाखेत देखील द्यावे लागेल जिथे कामगाराचे बँक खाते असेल, जेणेकरून वेळेवर पेन्शनसाठी त्याच्या बँक खात्यातून पैसे कापले जाऊ शकतील.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजनेअंतर्गत, असंघटित क्षेत्रातील कोणताही कामगार, ज्याचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही, तो या येजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.

टोल फ्री क्रमांकावरून माहिती मिळवा

या योजनेसाठी कामगार विभाग, एलआयसी, ईपीएफओ कार्यालयाला शासनाने श्रमिक सुविधा केंद्र केले आहे. येथे जाऊन कामगारांना योजनेची माहिती मिळू शकते. सरकारने या योजनेसाठी 18002676888 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. तुम्ही या क्रमांकावर कॉल करून योजनेची माहिती देखील मिळवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT