Zoho Mail Dainik Gomantak
देश

Zoho Mail: Gmail, Yahoo विसरा आता देशी ई-मेल वापरा; झोहोवर वैयक्तिक आणि बिझनेस मेल कसा तयार कराल? Step By Step प्रोसेस

Zoho Mail Account Creation: गेल्या काही दिवसांपासून एका भारतीय कंपनीची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. 'झोहो' असे या कंपनीचे नाव आहे.

Manish Jadhav

Zoho Mail Account Creation: गेल्या काही दिवसांपासून एका भारतीय कंपनीची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. 'झोहो' असे या कंपनीचे नाव आहे.अनेकजण जीमेलवरुन झोहो मेलवर आपले अकाउंट शिफ्ट (Shift) करत आहेत. यातच आता, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी देखील स्वदेशीला प्राधान्य देत आपल्या अधिकृत ईमेल पत्त्यात बदल केल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली. भविष्यात कोणत्याही अधिकृत आणि वैयक्तिक संवादासाठी त्यांच्या नवीन ईमेल पत्त्याचा वापर करावा, अशी विनंती यावेळी त्यांनी आपल्या फॉलोअर्संना केली.

अमित शाह यांचा नवा ईमेल पत्ता: amitshah.bjp@zohomail.in

झोहो मेल का आहे चर्चेत?

अलीकडेच, झोहो कंपनीने 'अराट्टाई' (Arattai) ॲप तयार केले, ज्याची व्हॉट्सॲपला (WhatsApp) टक्कर देणारे ॲप म्हणून जोरदार चर्चा आहे. याचबरोबर झोहोचे इतर ॲप्स आणि विशेषतः 'झोहो मेल' हे 'जीमेल'ला (Gmail) तगडा पर्याय म्हणून उदयास येत आहे. अनेक लोक आता सुरक्षिततेसाठी जीमेलवरुन झोहो मेलवर आपले अकाउंट शिफ्ट (Shift) करत आहेत. तुम्हालाही या प्लॅटफॉर्मवर आपले वैयक्तिक किंवा बिझनेस अकाऊंट (Business Account) तयार करायचे असेल, तर त्याची साधी सोपी प्रक्रिया तुम्ही जाणून घेतली पाहिजे.

झोहोवर पर्सनल (Personal) अकाऊंट कसे तयार करावे?

झोहो मेलवर खाते तयार करण्यासाठी खाली साधी सोपी प्रक्रिया दिली आहे.

  1. पहिल्यांदा तुम्ही झोहो मेलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे आणि 'पर्सनल ईमेल' (Personal Email) हा पर्याय निवडावा.

  2. त्यानंतर तुम्ही तुम्हाला हवा असलेला युजरनेम (Username) निवडू शकता (उदा. username@zohomail.com). हाच ईमेल तुमचा पत्ता बनेल.

  3. यानंतर पासवर्ड तयार करा. पासवर्ड किमान 8 अक्षरांचा असावा, ज्यात एक मोठे अक्षर, एक छोटे अक्षर, एक अंक आणि एक विशेष चिन्ह (Special Character) असणे आवश्यक आहे.

  4. यानंतर आपले पहिले नाव (First Name) आणि अंतिम नाव (Last Name) नमूद करा.

  5. फोन नंबर (Mobile Number) ही द्यावा, ज्यावर तुम्हाला पडताळणी (Verification) कोड मिळेल.

  6. त्यानंतर सेवांच्या अटी (Terms of Service) स्वीकारुन 'साइन अप फॉर फ्री' (Sign up for Free) वर क्लिक करा.

  7. अशाप्रकाररे तुम्ही फोनवर आलेला कोड टाकून अकाऊंट ओपन करु शकता.

बिझनेस (Business) अकाऊंट तयार करण्याची प्रक्रिया

तसेच, ज्या व्यक्तींकडे बिझनेसचे डोमेन नेम (Domain Name) आहे, त्यांनी खालीलप्रमाणे बिझनेस अकाऊंट तयार करावे.

  1. पहिल्यांदा zoho.com/mail येथे जावून 'बिझनेस ईमेल' चा पर्याय निवडा.

  2. त्यानंतर तुमच्याकडे असलेले डोमेन नेम (उदा. yourbusiness.com) वापरुन साइन अप करा.

  3. आपल्या संस्थेचे तपशील (Organization Details), डोमेन नेम, कंपनीचे नाव आणि आवश्यक ती माहिती भरा.

  4. तसेच, डोमेनची मालकी सिद्ध करण्यासाठी झोहोने दिलेल्या सूचनांचे पालन करुन तुमच्या डोमेन रजिस्ट्रारमध्ये DNS TXT रेकॉर्ड जोडा.

  5. तुमच्या डोमेनचे मेल एक्सचेंजर (MX) रेकॉर्ड्स झोहोच्या सर्व्हर्सकडे वळवा.

  6. ईमेल सुरक्षिततेसाठी तुमच्या डोमेनच्या DNS मध्ये SPF आणि DKIM साठी TXT रेकॉर्ड्स जोडा.

  7. तुमचा 'सुपर ॲडमिन' (Super Admin) ईमेल सेट करा आणि मोफत प्लॅनमध्ये 5 यूजर्सपर्यंत जोडा.

'मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन' (MFA) गरजेचं

ईमेल अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) जरुर करा. यामुळे केवळ पासवर्ड टाकून कोणीही तुमचे अकाऊंट लॉग इन करु शकणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही SMS आधारित पडताळणी निवडल्यास लॉग इन करताना तुमच्या फोनवर एक OTP (कोड) येईल, तो टाकल्यावरच अकाऊंट ओपन होईल. झोहो मेलमध्ये MFA चे चार पर्याय उपलब्ध आहेत. अनुक्रमे OneAuth, SMS आधारित OTP, OTP ऑथेंटिकेटर आणि YubiKey.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT