Amit Shah Goa Visit
Amit ShahDainik Gomantak

Amit Shah Goa Visit: अमित शहांचा भरगच्च 'गोवा दौरा'! ‘माझे घर’ योजनेचा करणार शुभारंभ; 230 उमेदवारांना देणार नियुक्तीपत्रे

Amit Shah Launches schemes in Goa: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील भव्य कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक अशा ‘माझे घर’ योजनेची सुरुवात केली जाणार आहे.
Published on

पणजी: राज्यभरातील सर्व प्रकारच्या बेकायदा, अनियमित घरांचा प्रश्न सरकारने सोडवला असून शनिवारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील भव्य कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक अशा ‘माझे घर’ योजनेची सुरुवात केली जाणार आहे.

सरकारी मालकीच्या आणि कोमुनिदाद मालकीच्या जमिनींवरील घरे नियमित करण्यासाठीचे अर्ज शनिवारपासून उपलब्ध करण्याचे सरकारने ठरवले आहे. याशिवाय अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते होणार आहे. वन हक्क कायदा, २० कलमी कार्यक्रमांतील घरांचे नियमितीकरण केलेल्यांना पत्रांचे वाटप यावेळी करण्यात येईल.

सरकारने या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. प्रत्येक पंचायत क्षेत्रातून शनिवारी दुपारी २ वाजता कार्यक्रमस्थळी लोकांना जाण्यासाठी बस निघेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यात मुक्तीनंतर घरांचा प्रश्न सोडवण्याचा हा सर्वांत मोठा प्रयत्न आहे.

त्याची माहिती पुढेही सर्वांना समजावी, यासाठी खास पुस्तिका तयार केली असून तिचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते शनिवारी होईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा शनिवारी दुपारी साडेचार वाजता गोव्यात येतील. रात्री ८ वाजेपर्यंत यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी घर नियमितीकरणाच्या विविध योजनांचे अर्ज वितरित करण्याची व्यवस्था केली आहे. या योजनांचे लाभार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

पंचायती, पालिका बँकेचा सन्मान

याच कार्यक्रमात चांगले काम केलेले पाच स्वयंपूर्ण मित्र, उत्तर व दक्षिण गोव्यातील (South Goa) प्रत्येकी दोन पंचायती व पालिका तसेच राज्यात सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगले काम केलेल्या बँकेला, शहा यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. राज्य कर्मचारी भरती आयोगाने निवडलेल्या २३० जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे या कार्यक्रमात देण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com