How Prime Minister Decide
How Prime Minister Decide Dainik Gomantak
देश

आरएसएस-इंदिरा गांधी संबंध, बांग्लादेश अन् अण्वस्त्र चाचण्या; नव्या पुस्तकातून खळबळजनक खुलासे

Ashutosh Masgaunde

'How Prime Ministers Decide' Reveals Relationship Of Indira Gandhi With RSS:

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. दोघेही एकमेकांकडे मदतीसाठी जात असत. संघाने आणीबाणीच्या काळात इंदिराजींना केवळ पाठिंबाच दिला नाही तर 1980 मध्ये त्यांना पुन्हा सत्तेत येण्यास मदत केली.

मात्र, इंदिराजींनी स्वत: संघापासून सुरक्षित अंतर ठेवले. स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांतील भारताच्या पंतप्रधानांच्या कार्यशैलीबाबत पत्रकार नीरजा चौधरी (Neeraj Choudhary) यांच्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड' (How Prime Minister Decide) या नव्या पुस्तकात हे दावे करण्यात आले आहेत.

पुस्तकात चौधरी यांनी लिहिले की, संघाच्या विरोधात असूनही इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात त्यांचा पाठिंबा मिळवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) तिसरे प्रमुख बाळासाहेब देवरस (Balasaheb Deoras) यांनी त्यांना आणीबाणीच्या काळात अनेकदा पत्रे लिहिली.

संघाचे अनेक नेते कपिल मोहन यांच्या माध्यमातून संजय गांधींशी संपर्क साधत असत. नीरजा यांच्या म्हणण्यानुसार, इंदिरा गांधी यांना अशी भीती होती की मुस्लिमांचा काँग्रेसवर राग असू शकतो, म्हणूनच त्यांना त्यांचे राजकारण हिंदूकरण करायचे होते.

या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थोडासा पाठिंबा, त्याची तटस्थ भूमिकाही त्यांना खूप उपयोगी पडली असती. 1980 मध्ये अटलबिहारी वाजपेयी आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा उभारण्यात व्यस्त असताना इंदिरा गांधी काँग्रेसचे हिंदूकरण करत होत्या.

देवरसांना इंदिरा गांधींमध्ये दिसायचा हिंदू नेता

या पुस्तकात इंदिराजींच्या जवळचे अनिल बाली यांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, संघाने 1980 मध्ये इंदिरा गांधी यांना 353 जागांवर प्रचंड विजय मिळवून त्यांना सत्तेत परतण्यास मदत केली. देशात अशा अनेक जागा होत्या ज्या त्या स्वत: जिंकू शकल्या नसत्या.

लवकरच प्रकाशित होणार्‍या पुस्तकात, बाली म्हणतात की इंदिरा गांधी मंदिरांना खूप भेट देऊ लागल्या, ज्यामुळे संघाचे नेते प्रभावित झाले. बाळासाहेब देवरसांनी तर 'इंदिरा या खूप मोठ्या हिंदू आहेत' असे विधानही केले होते. बाली यांच्या म्हणण्यानुसार, देवरस आणि इतर संघ नेते इंदिराजींमध्ये हिंदूंचा नेता पाहत असत.

कॉंग्रेस सोडलेले नेते राज्यांपुरते मर्यादित

चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस सोडलेल्या कोणत्याही नेत्याला व्हीपी सिंग (VP Singh) यांच्यासारखा राष्ट्रीय राजकारणात प्रभाव पाडता आला नाही. मग ते चंद्रशेखर असोत किंवा शरद पवार.(Sharad Pawar)

व्हीपी सिंग यांनी एका वर्षापेक्षा कमी काळ असतानाही काँग्रेसेतर सरकार स्थापन करण्यासाठी उजव्या, डाव्या, केंद्रीय आणि प्रादेशिक शक्तींना एकत्र आणले.

ही पहिली खरी राष्ट्रीय-युती होती. प्रादेशिक पक्षांना प्रथमच राष्ट्रीय राजकारणात सहभाग मिळाला. बाकीचे जे नेते पक्ष सोडून गेले ते फक्त राज्यांपुरतेच मर्यादित राहिले. उलट अनेक वेळा त्यांना सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज भासली.

पाकिस्तान फोडण्याचे श्रेय

तत्पूर्वी, १९७१ मध्ये पाकिस्तानचे तुकडे होणे आणि बांगलादेशच्या जन्मानेही आरएसएस भारावून गेला होता. तत्कालीन संघप्रमुख माधव सदाशिव गोळवलकर यांनी इंदिरा गांधी यांना पत्र लिहित, 'या कामगिरीचे श्रेय तुम्हाला जाते.' असे म्हटले होते.

अणुचाचण्यांच्या तीन वर्षांनंतर संघाने पुन्हा इंदिरा गांधींचे गुणगान सुरू केले. संघाला नेहमीच लष्करीदृष्ट्या मजबूत भारत हवा होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT