आज सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE आज अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर इयत्ता 10वीचा निकाल 2022 जाहीर करेल. या वर्षी CBSE ने परिक्षा संगम नावाचे एक नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे. ज्याद्वारे विद्यार्थी CBSE टर्म 2 चा निकाल सहज तपासू शकणार आहेत. (CBSE 10th Results 2022 News)
यावर्षी टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा cbresults.nic.in जाहीर केला जाईल.
तारीख आणि वेळ याची शक्यता आहे. ते बदलण्याची शक्यता आहे. सर्वांना CBSE इयत्ता 10वी निकाल 2022 चे लाइव्ह अपडेट येथे तपासण्याचा सल्ला दिला जातो. नव्याने लाँच करण्यात आलेले परिक्षा संगम डिजिटल पोर्टल CBSE इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे 10वी टर्म 2 बोर्ड परीक्षेचे निकाल सहज तपासण्यास मदत करेल.
विद्यार्थी मोबाईल Application UMANG आणि DigiLocker वरून CBSE इयत्ता 10वी टर्म 2 चा निकाल 2022 पाहु शकतात. CBSE 10वी टर्म 2 चा निकाल SMS सेवेद्वारे देखील उपलब्ध असेल. या वर्षी 35 लाख विद्यार्थ्यांनी CBSE इयत्ता 10वीची परीक्षा 2022 ला दिली होती.
CBSE 10वी टर्म 2 निकाल 2022: परिक्षा संगम पोर्टलवर तपासा
parikshasangam.cbse.gov.in या वेबसाइटवर जा.
'शाळा' लिंकवर क्लिक करा.
नवीन पेज उघडल्यावर 'Examination Activity' वर क्लिक करा.
त्यानंतर Theory Marks Upload वर क्लिक करा.
निकाल जाहीर झाल्यानंतर तुमचे गुण दिसून येतील.
निकाल तपासा, डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, सीबीएसई बोर्ड 4 जुलै रोजी निकाल जाहीर करू शकेल, जरी याबाबत अधिकाऱ्यांकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.