पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) दौऱ्यावरती जाणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन भीमावरम आणि गन्नावरममध्ये सुमारे 3000 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपासून भीमावरममध्ये मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी ठप्प झाली. पेदामीराम मैदानावर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे, मात्र तिथेही पावसामुळे चिखल झाला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले विशेष मुख्य सचिव (पर्यटन आणि संस्कृती) रजत भार्गव यांनी रविवारी तयारीचा संपुर्ण आढावा घेतला. (PM Narendra Modi's visit to Andhra Pradesh today)
भार्गव, पोलिस महासंचालक (डीजीपी) के.व्ही. राजेंद्रनाथ रेड्डी यांच्यासोबत, पश्चिम गोदावरी जिल्हा दंडाधिकारी एम. प्रशांती आणि इतर अधिकाऱ्यांनी पेडामिरन पार्क आणि सार्वजनिक सभेच्या तयारीचा देखील आढावा घेतला आहे. पाऊस पडल्यास काय उपाययोजना कराव्यात यावरही त्यांनी यावेळी चर्चा केली. डीजीपींनी भीमावरममध्ये उच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्रपणे आढावा बैठक घेतली आणि सुरक्षा सज्जतेबाबत सूचना देखील देण्यात आल्या.
राजेंद्रनाथ रेड्डी यांनी 'पीटीआय-भाषा'ला सांगितले की, 'आम्ही भीमावरम शहरात विविध पदांवर 2,200 पोलिस तैनात केले आहेत. गन्नावरम विमानतळावर 800 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत कारण पंतप्रधानांचे विमान त्या जागी उतरणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी आम्ही सर्व चोख सुरक्षा व्यवस्था करत आहोत. पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळी 10.10 वाजता हैदराबादहून विशेष विमानाने गन्नावरम येथील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहेत. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) पंतप्रधानांचे स्वागत करतील.
स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार
पंतप्रधान हेलिकॉप्टरने विमानतळावरून भीमावरम येथे पोहोचतील, तेथे ते सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सितारामा राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. पंतप्रधान मोदी 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित जाहीर सभेला संबोधित करतील. दुपारी 1.05 वाजता पंतप्रधान विजयवाडा विमानतळावर परततील आणि अहमदाबादला रवाना होतील. डीजीपी म्हणाले की भीमावरमच्या आसपास नियमित आरटीसी बस आणि वाहनांच्या हालचालींवर सोमवार दुपारपर्यंत बंदी असणार आहे.
डीजीपी म्हणाले की, 'सार्वजनिक सभेसाठी 1000 हून अधिक वाहनांमध्ये लोक येणे अपेक्षित आहे आणि या वाहनांचे पार्किंग मोठे अवाहन असणार आहे. आम्ही काही ठिकाणे चिन्हांकित केली आहेत, परंतु पावसामुळे खूप चिखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी हैदराबादला पोहोचले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.