Tej Pratap Yadav Dainik Gomantak
देश

Video: लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप पुन्हा चर्चेत, हॉटेल मॅनेजरने गुडघ्यावर बसून...

Varanasi: लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यादव हे सध्या चर्चेत आहेत.

Manish Jadhav

Varanasi: लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यादव हे सध्या चर्चेत आहेत. खरे तर वाराणसीतील एका हॉटेलमध्ये त्यांच्या रुमच्या झडतीचे प्रकरण अजूनही तापले आहे.

इतकेच नाही तर तेज प्रताप यांच्या साथीदारांचे सामान हॉटेलच्या रुममधून बाहेर काढून रिसेप्शनमध्ये ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.

आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकाने तेज प्रताप यांची माफी मागितल्याचा दावा केला जात आहे.

नुकतेच, तेज प्रताप यादव वाराणसीला (Varanasi) गेले होते. यादरम्यान तेज प्रताप आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी एका हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलमध्ये तेज प्रताप आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. आता जो व्हिडिओ समोर आला, त्यामध्ये हॉटेल मॅनेजर तेज प्रताप यांची माफी मागत असल्याचा दावा केला जात आहे.

दुसरीकडे, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तेज प्रताप हिरव्या रंगाचा टी-शर्ट घालून उभे आहेत आणि एक व्यक्ती त्यांच्या समोर गुडघ्यावर बसून माफी मागत आहे. असा दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती हॉटेल मॅनेजर असून तो तेज प्रताप यांची माफी मागत आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी (Police) सांगितले की, तेज प्रताप यांनी हॉटेलमध्ये गैरवर्तन केले नाही. तसेच त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे सामानही खोलीबाहेर फेकले गेले नाही. तेजप्रताप यांच्यासाठी बुक केलेली रुम तीन दिवसांपासून बंद असल्याचे हॉटेल व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले आहे. सर्व रुमची बिलेही भरलेली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT