Marriage Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: "मुस्लिम मुलीशी लग्न केल्यास हिंदू तरुणाला मिळणार 11 हजार रुपये", हिंदू धर्म सेनेची खळबळजनक घोषणा

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हिंदू मुलींच्या घटत्या संख्येमागे लव्ह जिहाद असल्याचा आरोप हिंदू धर्म सेनेने केला आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हिंदू मुलींच्या घटत्या संख्येमागे लव्ह जिहाद असल्याचा आरोप हिंदू धर्म सेनेने केला आहे. याविरोधात संघटनेने मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

लव्ह जिहादवर नवा वाद निर्माण करत उजव्या विचारसरणीच्या 'धर्म सेने'ने गुरुवारी मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

दरम्यान, धर्म सेनेचे संस्थापक आणि प्रमुख योगेश अग्रवाल म्हणाले की, मुस्लिम (Muslim) संघटना ज्या प्रकारे 'लव्ह जिहाद'चा प्रसार करत आहेत, हिंदूंना पुढे येऊन त्यांच्या मुलांना मुस्लिम मुलींशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. अग्रवाल पुढे म्हणाले की, या धर्मांतरामुळे हिंदू मुलींची संख्या कमी होत चालली आहे.

अग्रवाल पुढे म्हणाले की, "मुस्लीम मुलीवर प्रेम करणाऱ्या हिंदू तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यास, धर्म सेना सगळी व्यवस्था करेल. विशेष म्हणजे त्याला 11 हजार रुपयांचे रोख बक्षीसही देईल.''

दुसरीकडे, धर्म सेना ही जबलपूरमधील जुनी हिंदू संघटना असून 200 हून अधिक सक्रीय कार्यकर्ते आहेत. ही संघटना आधी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत होती, पण नंतर दोघांशी संबंध तोडले.

देशभरात 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून मुस्लिम मुलांकडून हिंदू मुलींना फूस लावण्याच्या कथित वाढत्या घटना पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. सध्या ही रक्कम 11,000 रुपये असेल, मात्र त्यांनी कुठून तरी आर्थिक मदतीची व्यवस्था केल्यास बक्षीस वाढवले ​​जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, 'देशात हिंदू मुलींची संख्या कमी झाली असून हा उपक्रम सध्या अत्यंत आवश्यक आहे.' अग्रवाल नुकतेच जबलपूरमधील एका हिंदू (Hindu) मुलीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते, जिने मुस्लिम तरुणाशी लग्न केले होते. ही तरुणी 'लव्ह जिहाद'ची शिकार झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT