Madhya Pradesh: संसार सुरु होण्याआधीच कुटुंबनियोजन, सामूहिक विवाह सोहळ्यात कंडोम वाटल्याने गोंधळ!

Madhya Pradesh News: मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत झालेल्या विवाह सोहळ्यात वधूंना दिलेल्या मेकअप किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या आहेत.
Marriage
MarriageDainik Gomantak
Published on
Updated on

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील झाबुआ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत झालेल्या विवाह सोहळ्यात वधूंना दिलेल्या मेकअप किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या आहेत.

त्यानंतर आता गदारोळ झाला आहे. प्रत्यक्षात सोमवारी जिल्ह्यातील थंडला येथील दसरा मैदानावर 296 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पाडला.

मुख्यमंत्री शिवराज सिंह (Chief Minister Shivraj Singh) यांची ही योजना सर्वसामान्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, मात्र अधिकाऱ्यांमुळे ही योजना बदनाम होताना दिसत आहे.

विवाह सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी वधूंना मेक-अप किटचे वाटप केले. या मेकअप किटमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांसह कंडोमची पाकिटे ठेवण्यात आली.

या सोहळ्यात स्वत: मुख्यमंत्र्यांनी विवाहबंधनात अडकलेल्या जोडप्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

Marriage
Madhya Pradesh Crime: मुस्लिम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरुन हिंदू तरुणाची हत्या, खळबळजनक घटनेने उडाला थरकाप!

गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप

नववधूंना मेक-अप किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्रूमिंगच्या वस्तूंमध्ये गोळ्या आणि कंडोम ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली असता, त्यांनी हा कारनामा आरोग्य विभागाचा असल्याचे स्पष्ट केले.

Marriage
Madhya Pradesh: रामकथेचं आयोजन करणं पडलं महागात, कथावाचकाच्या पट्टशिष्याने पळवली बायको

लग्नापूर्वी वधूची गर्भधारणा चाचणी केली जाते

मुख्यमंत्री विवाह सोहळ्यात अशी विचित्र चूक पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी लग्नादरम्यान (Marriage) वधू-वरांची गर्भधारणा चाचणी केली गेली होती. प्रत्यक्षात एप्रिलमध्ये दिंडोरी येथे झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नापूर्वी 219 वधूंची गर्भलिंग चाचणी करण्यात आली होती, त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com