Army Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येचा लष्कराने घेतला बदला

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी लष्कराने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा नापाक डाव उद्ध्वस्त केला.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी लष्कराने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा नापाक डाव उद्ध्वस्त केला. कुलगाममध्ये सुरु असलेल्या कारवाईत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येमध्ये या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, अनंतनागमध्येही हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराने परिसराची नाकेबंदी करुन कारवाई सुरु केली आहे. (hindu teacher rajni bala murderer terrorists killed in kulgam encounter)

दरम्यान, काश्मीर झोनच्या पोलीस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासून कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली. 24 तासांहून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येत या दहशतवाद्यांचा (Terrorists) हात असल्याचे सांगण्यात येत आहे.

दहशतवाद्यांनी शाळेत घुसून गोळीबार केला

31 मे रोजी कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा हायस्कूलमध्ये महिला शिक्षिका रजनी बाला (Rajni Bala) यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. शाळेत घुसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांचा मृतदेह गोळ्यांनी छिन्नविछिन्न केला होता. या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

अनंतनागमध्ये हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांशी चकमक

आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यातील हंगलगुंड भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली आहे. निवासी भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. अनंतनागच्या कोकरनाग भागात हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी लपले होते. त्यांच्याशी चकमक सुरुच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT