Jammu and Kashmir: खांडीपोरा भागात चकमक; 1 दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात चकमक.
Jammu and Kashmir in Bandipora
Jammu and Kashmir in BandiporaDainik Gomantak

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा (Hizbul Mujahideen) एक दहशतवादी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे. जिल्ह्यातील खांडीपोरा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकारी कामावर असून अजूनही चकमक सुरूच आहे. (Jammu and Kashmir Flint in Bandipora area 1 terrorist killed)

शनिवारी पहाटे ही चकमक सुरू झाली, एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट द्वारे दिली. दरम्यान, भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीर (Jammu-Kashmir) पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत बारामुल्ला येथे प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) शी संबंधित असलेल्या दोन सक्रिय दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली होती.

"झालेल्या घटनेवर तत्परतेने कारवाई करत, पोलिसांनी लष्करासह प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या दोन सक्रिय दहशतवाद्यांना अटकेत घेतले आहे. त्यांची ओळख इरशाद अहमद मीरचा मुलगा अब्दुल रहमान मीर (दहशतवादी) आणि बशीर अहमदचा मुलगा झाहिद बशीर, दोघेही नेहलपोरा पट्टण भागातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून 2 चायनीज पिस्तूल, 18 जिवंत काडतुसे आणि 2 मॅगझिनसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रास्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com