Landslide on moving vehicle in Himachal Dainik Gomantak
देश

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Himachal Pradesh Accident News: हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्पीती जिल्ह्यातून एक अत्यंत धडकी भरवणारी बातमी समोर आली.

Manish Jadhav

Himachal Pradesh Accident News: हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्पीती जिल्ह्यातून एक अत्यंत धडकी भरवणारी बातमी समोर आली. पांगी-उदयपूर मार्गावरील कुडूनालाजवळ एका चालत्या टाटा सुमोवर अचानक मोठी दरड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लाहोल-स्पीती पोलीस प्रशासनाने या अपघाताला अधिकृत दुजोरा दिला असून, मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु केले.

मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे उदयपूर-किलाड रस्ता गुरुवारी बंद झाला होता. रस्ता बंद असल्यामुळे सर्व प्रवासी तिंदी भागात थांबले होते. शुक्रवारी रस्ता मोकळा झाल्यानंतर प्रवाशांना घेऊन ही गाडी पांगीच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र, लाहोल खोऱ्यापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडूनालाजवळ पोहोचताच, अचानक डोंगराचा मोठा भाग खचला आणि तो थेट चालत्या गाडीवर येऊन कोसळला.

दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच लाहोल-स्पीती पोलिसांचे पथक आणि स्थानिक बचाव दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखालून एका जखमी व्यक्तीला सुखरुप बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील (Accident) बहुतांश मृत आणि जखमी हे चंबा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. भरमौरचे आमदार जनक राज यांनी चंबा आणि लाहोल-स्पीतीचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून बचाव कार्यात अधिक गती आणण्याची विनंती केली.

सध्या पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी ढिगारा हटवून इतर प्रवाशांचा शोध घेत आहेत. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतरच मृतांची आणि एकूण प्रवाशांची अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे हिमाचल प्रदेशात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

VIDEO: गाड्या अडवल्या, एकमेकांना बदडलं अन् बाटल्या मारल्या... पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनी धुडगूस; व्हायरल व्हिडिओवर लोक म्हणाले, "आमची जनताच अडाणी!"

SCROLL FOR NEXT