High level meeting in Delhi of IB & Raw on Terrorism and Taliban Issue
High level meeting in Delhi of IB & Raw on Terrorism and Taliban Issue Dainik Gomantak
देश

गुप्तचर संघटनांची दिल्लीत महत्वाची बैठक,या विषयांवर झाली चर्चा

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान (Pakistan) समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा (Terrorist Model) दिल्लीत (Delhi)पर्दाफाश झाल्यानंतर देशातील सुरक्षा संस्था आता आता सतर्क झाल्या आहेत. दिल्ली आणि शेजारील राज्यांचे पोलीस दल आणि देशातील विविध गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी भारतातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबाबत बैठक घेतली आहे . अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही बैठक पाकिस्तान समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस मुख्यालयात दिल्ली पोलिसांसोबत विविध गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणांच्या बैठकीदरम्यान अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाच्या मुद्द्यावरही जोरदार चर्चा झाली आहे .(High level meeting in Delhi of IB & Raw on Terrorism and Taliban Issue)

रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RA), इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे प्रमुख यांच्यासह उच्च गुप्तचर संस्थांचे अनेक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाच्या बैठकीत अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आणि तेथील सद्यस्थितीबाबत भारताला अत्यंत जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज आहे अशी भूमिका मांडण्यात अली आहे. उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने तालिबान आणि त्याच्या सध्याच्या नवीन सरकारबद्दल अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे कारण ते नवीन रणनीतीमुळे भारतासाठी धोका म्हणून उदयास येऊ शकतात.

या अत्यंत महत्वाच्या बैठकीत, पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या अनेक राज्य अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) भारतात त्यांचे गुप्तहेर नेटवर्क मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तान हनी ट्रॅपिंगद्वारे देशातील अधिकाऱ्यांकडून भारताविषयी गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

सूत्रांनी सांगितले की जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा आणि केंद्रशासित प्रदेशातील आव्हाने देखील उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय आहेत. या दरम्यान, बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी भारतात दहशतवाद पसरवण्याच्या पाकिस्तानच्या धोरणांना सामोरे जाण्याच्या मार्गांवर विचारमंथन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Loksabha Election 2024 : काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Amit Shah In Goa: भाऊंसाठी म्हापशात ‘शाही’ सभा; 25 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT