Jammu-Kashmir: कुलगामध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा पोलिसाची हत्या

जम्मू -काश्मीरच्या(Jammu-Kashmir) कुलगामध्ये (Kulgam) दहशतवाद्यांनी (Terrorists) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक पोलीस आणि एका मजुराची गोळ्या घालून हत्या केली आहे .
Jammu-Kashmir: Terrorists killed one Policeman & one migrant labor in Kulgam & Katihar
Jammu-Kashmir: Terrorists killed one Policeman & one migrant labor in Kulgam & KatiharDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू -काश्मीरच्या(Jammu-Kashmir) कुलगामध्ये (Kulgam) दहशतवाद्यांनी (Terrorists) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक पोलीस आणि एका मजुराची गोळ्या घालून हत्या केली आहे . पोलिसांच्या माहितीनुसार , रात्री 8.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी डीएच पोडा परिसरातील कटिहारमधील (Katihar) प्रीत नगर येथील रहिवासी शंकर कुमार चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. (Jammu-Kashmir: Terrorists killed one Policeman & one migrant labor in Kulgam & Katihar)

काल संध्याकाळी 6.05 च्या सुमारास दहशतवाद्यांनी बंटो शर्मा नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार केला होता ,त्यात ते गंभीर जखमी झाले होते . अधिकाऱ्यांनी सांगितले की शर्मा यांना रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला.

या हल्ल्यांनंतर, काश्मीर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, फुटीरतावादी नेते एसएएस गिलानी यांच्या मृत्यूनंतर तसेच दहशतवादी संघटनांच्या शीर्ष कमांडरांच्या नुकत्याच झालेल्या हत्येमुळे घाटीमध्ये शांततेचे वातावरण आहे . म्हणूनच पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांनी आज कुलगाम जिल्ह्यात एका भ्याड हल्ल्यात एका नि: शस्त्र पोलिस (PSI) आणि एका निष्पाप मजुराची हत्या केली आहे.

Jammu-Kashmir: Terrorists killed one Policeman & one migrant labor in Kulgam & Katihar
मुंबईत आणखी एका दहशहतवाद्याला अटक

12 सप्टेंबरलाही दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या खानयार भागात एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती . कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी परिविक्षाधीन उपनिरीक्षक अर्शद अहमद याने एका आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले होते, जिथे परत जात असताना त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, दहशतवादी पोलिस कर्मचाऱ्यावर दोन गोळ्या झाडून पळून जाताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com