Hemant Soren Resignation Dainik Gomantak
देश

Hemant Soren Resignation: हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री

Manish Jadhav

Hemant Soren Resignation: जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या निशाण्यावर असलेल्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांना अटक करण्याचा निर्णयही ईडीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, चंपई सोरेन आता झारखंडचे नवीन मुख्यमंत्री असतील. चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. चंपई सोरेन राजकारणात येण्यापूर्वी शेती करत होते. परंतु ते शिबू सोरेन यांचे सहकारी राहिले आहेत. त्याचवेळी, ईडीने हेमंत सोरेन यांची दीर्घकाळ चौकशी केली आणि त्यांच्या उत्तरांवर एजन्सी समाधानी नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, हेमंत सोरेन 15 दिवस रांचीमध्ये ईडीच्या कोठडीत राहू शकतात अशीही माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून कांके रोडवरील राहत्या घरी त्यांची चौकशी करण्यात येत होती. सोरेन यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने ईडीने त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. सोरेन यांच्या अटकेची भनक लागताच सत्ताधारी आघाडीने नवा नेता निवडून सरकार स्थापन करण्याची तयारी केली. त्यासाठी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली होती. विधीमंडळ पक्षाने चंपई सोरेन यांची नेता म्हणून निवड केली आहे.

नवीन नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार

याआधी ईडीने हेमंत सोरेन यांना अटक करत असल्याची माहिती दिली. मात्र, सोरेन यांना अटक होण्याचे संकेत सायंकाळी 5 वाजताच दिसत होते. यासोबतच सत्ताधारी आघाडीने नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरु केली होती. युतीचे सर्व आमदार बुधवारी सकाळपासूनच मुख्यमंत्री भवनात जमले होते. मंगळवारी सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत असे ठरले की, त्यांना अटक झाल्यास नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.

सोरेन यांच्या उत्तरावर ईडी समाधानी नाही

हेमंत सोरेन यांच्या नवी दिल्लीतील शांती निकेतन येथील निवासस्थानातून सोमवारीच ईडीने 36 लाख रुपये रोख, एक बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रे जप्त केली होती. याबाबत ईडीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. सोरेन यांनी रोख रक्कम आणि कार आपली असल्याचे नाकारले. याशिवाय, रांचीच्या बडगई भागात सुमारे चार एकर जमिनीच्या मालकीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सोरेन यांच्या उत्तरांवर ईडीचे अधिकारी समाधानी नव्हते.

शिबू सोरेन यांचे निकटवर्तीय

चंपई सोरेन हे शिबू सोरेन यांचे निकटवर्तीय आहेत. वेगळ्या झारखंड राज्याची मागणी झाल्यावर ते शिबू सोरेन यांच्यासोबत आंदोलनात सामील झाले होते. या आंदोलनता मोठी भूमिका बजावल्याबद्दल त्यांना 'झारखंड टायगर' असेही संबोधले जाते. सध्याच्या सरकारमध्ये ते परिवहन मंत्री आहेत. त्यांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे.

प्रशासकीय अनुभव

चंपई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांना प्रशासनाचाही चांगला अनुभव आहे. सर्वप्रथम त्यांना अर्जुन मुंडा यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते. 11 सप्टेंबर 2010 ते 18 जानेवारी 2013 पर्यंत ते मंत्री होते. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि त्यानंतर झामुमोचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदासह परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याचवेळी, 2019 मध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पुन्हा स्थापन झाले तेव्हा त्यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT