CM Hemant Soren: 'मी गुन्हा केला असेल तर अटक करा...,' CM सोरेन यांचं ईडीला आवाहन

Hemant Soren Statement: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले नाहीत.
CM Hemant Soren
CM Hemant SorenDainik Gomantak
Published on
Updated on

Hemant Soren Statement: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीला खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, "आज मला ईडीसमोर हजर राहायचे होते, पण छत्तीसगडमध्ये माझा आधीच एक कार्यक्रम होता. मी काही गुन्हा केला असेल तर मला अटक करा. चौकशी का करताय?''

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना आज अवैध खाण प्रकरणी चौकशीसाठी रांची कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी JMM कार्यकर्त्यांनी रांचीमध्ये मोर्चा काढला.

CM Hemant Soren
ED summons Hemant Soren: 'ईडी' करणार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी

तसेच, आपल्या समर्थकांना संबोधित करताना सीएम सोरेन म्हणाले की, 'मी गुन्हा केला असेल तर थेट अटक करा. त्यांनी ईडी, भाजप (BJP) कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. झारखंडवासीयांची भीती? अजून आम्ही काही केले नाही.'

सीएम सोरेन पुढे म्हणाले की, 'या लोकांनी नेहमीच येथील आदिवासी, दलित, मागासलेल्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. आदिवासी, दलित पुढे जावेत असे या लोकांना वाटत नाही. या लोकांचा आदिवासी, दलित, मागासलेल्यांवर राग आहे.'

CM Hemant Soren
CM Hemant Soren: 'हा आदिवासीचा मुलगा आहे, घाबरणार नाही', हेमंत सोरेन यांचा भाजपवर हल्लाबोल

ते पुढे असेही म्हणाले की, 'सध्याचे आघाडी सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान सरकार स्थापनेनंतर सुरु झाले. अनेक वेळा विरोधकांनी आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.'

ईडीने समन्स बजावले

ईडीने (ED) 3 नोव्हेंबर रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित अवैध खाणकामाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले होते. सोरेन (47) यांना गुरुवारी राज्याची राजधानी रांची येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले.

CM Hemant Soren
CM Hemant Soren Disqualification: झारखंड CM हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द

अधिका-यांनी सांगितले की, 'एजन्सीला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) सोरेन यांची चौकशी करायची आहे. त्यांचे म्हणणे नोंदवायचे आहे. या प्रकरणी ईडीने यापूर्वी सोरेन यांचे राजकीय सहकारी पंकज मिश्रा आणि इतर दोघांना अटक केली होती.'

CM Hemant Soren
लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन

दुसरीकडे, राज्यातील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित गुन्ह्यांमधून मिळालेल्या पैशांचा व्यवहार कोणत्या माध्यमातून झाला हे तपासण्यात आल्याचे एजन्सीने म्हटले आहे. बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणीच्या कथित घटनांसंदर्भात 8 जुलै रोजी ईडीने मिश्रा आणि त्यांच्या कथित साथीदारांच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती, त्यानंतर चौकशी सुरु झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com