Hemant Soren Arrested Dainik Gomantak
देश

मिलॉर्ड, काहीतरी नियम करा, मुख्यमंत्र्यांना अशी कशी अटक होऊ शकते? हेमंत सोरेन यांची SC मध्ये धाव

Supreme Court: ईडीने केलेल्या अटकेविरोधात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Manish Jadhav

Hemant Soren Arrested: ईडीने केलेल्या अटकेविरोधात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी ईडीच्या अटकेला आव्हान दिले आहे. त्यांच्या वतीने हजर होऊन ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विनंती केली की, 'तुम्हाला मनी लाँडरिंगच्या कलम 19 मधील तरतुदींवर प्रकाश टाकावा लागेल. एखाद्याला अशा प्रकारे अटक कशी केली जाऊ शकते.' यावर लवकरच निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी खंडपीठाकडे केली. यावर उद्याच सुनावणी घेण्याचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मान्य केले.

यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, हेमंत सोरेन यांनी उच्च न्यायालयात (High Court) अर्ज दाखल केला आहे. यावर कपिल सिब्बल यांनी सांगितले की, ''हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी उच्च न्यायालयातून अर्ज मागे घेतला आहे. यादरम्यान कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या मेमोमध्ये ही वेळ 10 वाजताची आहे, तर प्रत्यक्षात अटक संध्याकाळी 5 वाजता झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तुम्ही याकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा.''

यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राडू म्हणाले की, 'हेमंत सोरेन यांच्यावरील आरोप अतिशय गंभीर आहेत. ही देखील लक्षवेधी बाब आहे.' एवढेच नाही तर, सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी अटकेचा संबंध राजकीय कारणाशीही जोडला. निवडणुकीपूर्वीच (Election) अटकेच्या कारवाया का वाढतात, असा सवाल त्यांनी केला. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, 'तुमच्या सर्व प्रश्नांवर उद्या विचार करु.' या अटकेमुळे हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून आता त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते चंपई सोरेन राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत, हे विशेष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT