Rain Update Dainik Gomantak
देश

Heavy Rain Update: सावधान! 'या' 6 राज्यांमध्ये पुढील 3 दिवस पडू शकतो धो-धो पाऊस

गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरातील हवामान विस्कळीत झाले आहे. कुठे दुष्काळाने जनता हैराण झाली आहे तर कुठे पुराने कहर केला आहे. या सगळ्या दरम्यान, भारतीय हवामान खात्याने गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची नवीन शक्यता लक्षात घेता, ओडिशामध्ये आणखी पावसाची अपेक्षा आहे.

हवामान खात्याच्या या अलर्टनंतर ओडिशा सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापासून आणि आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून समुद्रात जाऊ नये, कारण या कालावधीत समुद्राची स्थिती धोकादायक राहण्याची शक्यता आहे. ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे

IMD च्या इशाऱ्यानुसार, ओडिशातील दबाव निर्माणाचा परिणाम महाराष्ट्राच्या (Maharashtra) अनेक भागात दिसायला लागला आहे. पुण्यात रविवारीच सलग तीन-चार तास पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचे हाल झाले. सोमवारीही अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली.

केरळमधील 9 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

केरळमधील नऊ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. विभागाने ज्या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे त्यात एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड यांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील डोंगराळ भागात पाऊस पडत असून केरळ सरकारने या भागात पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT