द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी वसीम रिझवी यांना SC कडून दिलासा, सशर्त जामीन मंजूर

Supreme Court: उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र त्यागी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
Wasim Rizvi
Wasim RizviDainik Gomantak

Wasim Rizvi: द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी हरिद्वार तुरुंगात बंद असलेले उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र त्यागी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने रिझवी यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला असून पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केल्याचेही सुनावणीदरम्यान उघड झाले. 29 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हरिद्वार द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात 17 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव रिझवी यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम जामीन वाढवण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

Wasim Rizvi
Supreme Court: 'नैतिक शिक्षणाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे'

दुसरीकडे, रिझवी यांना शरणागती पत्करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर रिझवींनी आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव रिझवी यांना यापूर्वीच सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Wasim Rizvi
Supreme Court: '...अजूनही कलम-66A अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो, ही चिंतेची बाब'

रिझवींच्या जीवाला धोका होता!

काली सेना प्रमुख स्वामी आनंद स्वरुप यांनी तुरुंगात असलेल्या वसीम रिझवी (Wasim Rizvi) उर्फ ​​जितेंद्र नारायण त्यागी यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. जितेंद्र नारायण त्यागी यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधीही रिझवी यांनी जीवाला धोका असल्याचे कारण देत तुरुंगात सुरक्षेची मागणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com