झारखंडमधील पाकूरमध्ये मोबाईल परत न केल्याने प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली. हे प्रकरण महेशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रियकराने प्रेयसीला स्मार्टफोन भेट दिला होता. त्याने प्रेयसीला त्याला परत करण्यास सांगितले असता प्रेयसीने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या (Murder) केली.
पोलिसांनी सांगितले की, मृत महिला तिच्या 20 वर्षीय प्रियकरासह फुटबॉल सामना पाहण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र त्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यानंतर सोमवारी प्रेयसीचा मृतदेह घराजवळील निर्जन ठिकाणी पडलेला आढळून आला.
दोघेही गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. आरोपी अनेकदा मुलीच्या घरी येत असे. मात्र काही दिवसांपूर्वी आरोपीच्या पालकांनी त्यांचे लग्न दुसरीकडे जमवले होते.
त्यानंतर आरोपी प्रेयसीला भेट दिलेला स्मार्टफोन (smartphone) परत करण्यास सांगत होता. मात्र मुलीने फोन परत करण्यास नकार दिला. रविवारीही याच गोष्टीवरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली
पोलीस (Police) अधिकारी नवनीत अँथोनी हेमब्रम यांनी सांगितले की, आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. फुटबॉलचा सामना पाहून दोघे परत येत असताना त्याने प्रेयसीवर धारदार वस्तूने हल्ला केल्याचे त्याने सांगितले. यात मैत्रिणीचा जागीच मृत्यू (Death) झाला. त्यानंतर प्रियकर स्मार्टफोन घेऊन पळून गेला. पोलिसांनी आरोपीला कंकरबोना येथून अटक केली आहे. आणि मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.