CM Basavaraj Bommai Dainik Gomantak
देश

मुख्यमंत्र्यांना आधी धमकी नंतर मागितली माफी

हिंदू धर्माचे केंद्र म्हणून मंदिरांकडे पाहिले जाते. अशी मंदिरे नष्ट होत असल्याने असह्य झाले त्यानंतर मी बोललो.

दैनिक गोमन्तक

कर्नाटक : नंजनगुड,(Nanjangud) जि. म्हैसूर येथील हुच्चुगणी येथील महादेवम्मा मंदिर काही दिवसांपूर्वी पाडण्यात आले होते.यानंतर धर्मेंद्र यांनी मंगळूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, हिंदूवर (Hindu)हल्ले झाले त्यावेळी महात्मा गांधींनाच सोडले नव्हते. आता बोम्मई यांच्याबाबत मवाळ भूमिका कशी घेऊ? बोम्मई, बी. एस. येडियुराप्पा यांनी या विषयी विचार करावा.

या व्यक्तव्यानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अखिल भारतीय हिंदू महासभेचे राज्य मुख्य सचिव धर्मेंद्र (Dharmendra)यांनी शनिवारी जाहीरपणे धमकी दिली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धर्मेंद्र यांनी माफी मागितली. माफी मागताना धर्मेंद्र म्हणाले, हिंदू धर्माचे केंद्र म्हणून मंदिरांकडे पाहिले जाते. अशी मंदिरे नष्ट होत असल्याने असह्य झाले त्यानंतर मी बोललो. या रागातून आपण मुख्यमंत्र्यांविरुद्ध तीव्र टीका केली. त्यांना धमकावण्याचा माझा कोणत्याही प्रकारचा उद्देश नव्हता. मंदिर पाडण्यासाठी महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi)हत्येबद्दल बोलले. आणि हा संदर्भ देणे योग्य नव्हते.

त्याआधी पत्रकार परिषदेत धर्मेंद्र यांनी भाजपकडून अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी मोठे राजकारण केले होते. असा आरोप भाजप सरकारवर केला. मतांसाठी हिंदूंची मंदिरे पाडली जातात आणि मते आपल्याकडे वळविले जातात.

जर हिंदूंवर हल्ले होत असतील तर अखिल भारतीय हिंदू महासभा याबाबत गप्प बसणार नाही. गांधींनाच सोडले नव्हते, आता मुख्यमंत्री आणि इतरांबाबत कसा विचार करतील? असे व्यक्तव्य धर्मेंद्र यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)आदेश दिल्याने अनधिकृत हिंदूंची श्रद्धास्थाने पडली जात आहे. राज्य सरकारने मतांसाठी मंदिरांना लक्ष्य बनवले आहे.आजतागायत मशीद किंवा चर्चना धक्का लावलेला नाही. सरकारच्या या कार्यामुळे संघ परिवारातर्फे निदर्शने केली जात आहेत. राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता असून हिंदू कार्यकर्ते केवळ आंदोलने करतात. त्यांनी भाजपवर बहिष्कार घालावा, असेही आव्हान धर्मेंद्र यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Electricity Bill Waiver: धारगळ येथील 'फॉर्म्युला-4' आयोजकांना वीज बिल माफी नाही; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण

Revolutionary Goans Party: खोलकरांच्‍या बडतर्फीच्‍या आदेशाला बोरकरांकडून वाटाण्‍याच्‍या अक्षता; 'मीच राष्ट्रीय अध्यक्ष!' वीरेश बोरकरांचा दावा, त्‍यामुळे हा आदेश अवैध असे स्‍पष्‍ट केले

Supreme Court Peaceful Protest Rights: केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार कशासाठी? सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीदरम्यान यंत्रणेवर ताशेरे

Goa E Challan Wrongly Issued: दुचाकीचा नियमभंग, दंड मात्र चारचाकी धारकाला; चुकीच्या ई-चलनामुळे वाहनमालकाची धावपळ, अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर नोंद रद्द

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

SCROLL FOR NEXT