कर्नाटक-महाराष्ट्र सीमाविवाद एक संपलेला अध्याय

नवे केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांची मंत्रिपदावर निवड होताच कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न संपल्याचा साक्षात्कार झाल्याचे दिसत आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटक : बिदर भागातील मराठी मतांवर निवडून आलेले खासदार व नवे केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांची मंत्रिपदावर निवड होताच कर्नाटक-महाराष्ट्र (Karnataka-Maharashtra) सीमाप्रश्न संपल्याचा साक्षात्कार झाल्याचे दिसत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यंनी यांनाी सीमावाद एक संपलेला अध्याय असे म्हटले आहे. सीमावाद अस्तित्त्वात नसल्याचा दावा करत ते म्हणाले की, हा मुद्दा खेचून धरण्यात काही अर्थ नाही. (Union Minister Bhagwant Khuba commented that Karnataka-Maharashtra border dispute is over)

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न
Weekend: तुम्ही या ठिकाणी फिरायला जाल तर फटके खाल...

या मुलाखतीत मंत्री खुबा यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाविवाद, विकासकामे यावर आपले मतं मांडून भविष्यातील आव्हानांवर चिंता व्यक्त केली आहे. बिदरमधील मराठी जनता कानडी लोकांशी सामंजस्याने रहात असल्याचे सांगत ते स्वत:हून कानडी भाषा शिकण्यास उत्सुक असल्याचा दावा त्यांनी सीमाप्रश्नावर बोलताना केला. ते म्हणाले की, सीमावर्ती जिल्ह्यांबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेला सीमावाद हा एक बंद अध्याय आहे. महाराष्ट्र सरकार दावा करीत असलेल्या प्रदेशात बेळगाव, भालकी, निपाणी, खानापूर आणि कारवारसह बिदर भागाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या भागांच्या हस्तांतरणासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

कल्याण-कर्नाटक प्रदेशातील मराठी भाषिक लोकांनी कन्नड स्वीकारल्याचा जावईशोधही त्यांनी लावला आहे. या भागातील मराठी लोक सीमाप्रश्न विसरून आपल्या मुलांना कन्नड भाषा शिकवू लागले असल्याचा त्यांनी दावा केला. भगवान खुबा यांना केंद्रीय मंत्रींडळात खत व रासायनिक लेखा राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे, जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी, केंद्र सरकारच्या योजना आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लिंगायत समाजाचे कांही नेते मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पदावरून उतरवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या विषयावर त्यांनी उत्तर देणे जाणीवपुर्वक टाळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com