Having physical relations through second marriage while married is rape, High Court gives important verdict. Dainik Gomantak
देश

विवाहित असताना दुसरे लग्न करणे हा बलात्कारच, हायकोर्टाने शिक्षकाला फटकारले

Bigamy: जून 2014 मध्ये ते 31 जानेवारी 2016 पर्यंत आरोपी आणि पीडिता एकत्र राहिले. त्यानंतर त्याने तिला सोडून दिले आणि तो आपल्या पहिल्या पत्नीकडे परत गेला.

Ashutosh Masgaunde

Having physical relations through second marriage while married is rape, Mumbai High Court gives important verdict:

पहिली पत्नी असतानाही जर एखाद्या व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर ते केवळ द्विपत्नीत्वाच्या श्रेणीत येत नाही तर पतीचे वर्तन 'बलात्काराच्या' कक्षेतही येते. अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. एका शिक्षकाची याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने असे निरिकक्षण नोंदवले

एका शिक्षकाने पहिली पत्नी असतानाही दुसरे लग्न केले. यावेळी त्याने दुसऱ्या महिलेशी खोटे बोलून पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता शारीरिक संबंध ठेवले. आता न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि राजेश पाटील यांनी त्या शिक्षकाला दिलासा देण्यास नकार देत एफआयआर रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी आरोपी शिक्षकाविरुद्ध बलात्कार आणि द्विभार्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, फेब्रुवारी 2006 मध्ये पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने महिलेला भेटायला सुरुवात केली.

या विवाहीत शिक्षकाने त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे सांगत पीडितेशी विवाह केला. जून 2014 मध्ये ते 31 जानेवारी 2016 पर्यंत आरोपी आणि पीडिता एकत्र राहिले. त्यानंतर त्याने तिला सोडून दिले आणि तो आपल्या पहिल्या पत्नीकडे परत गेला.

चौकशी केल्यावर, पीडित महिलेच्या लक्षात आले की आरोपीने तिला घटस्फोटाची चुकीची माहिती दिली आणि खोटे आश्वासन देऊन लग्न केले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

आरोपीच्या वकिलाने असा युक्तीवाद केला की, माझ्या अशिलाने 2010 मध्ये त्याच्या पत्नीविरुद्ध सुरू केलेली घटस्फोटाची कारवाई मागे घेतली होती. आणि याची माहिती माझ्या अशिलाचा संबंध असलेल्या महिलेला होती.

माझ्या अशिलाने ही महिला अडचणीत आहे हे लक्षात घेऊन, तिला सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक आधार दिला. त्यांचे हे सर्व संबंध सहमतीने होते, असा युक्तिवाद केला त्यामुळे हा प्रकार बलात्कार गुन्ह्याअंतर्गत येत नाही.

आरोपीची बाजू ऐकूण घेतल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, आरोपीने त्याचे पहिले लग्न अस्तित्वात असताना, दुसऱ्या महिलेशी लग्न करणे आणि नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हे कलम ३७६ म्हणजेच बलात्काराच्या अंतर्गत येते.

यावर भाष्य करताना न्यायालयाने आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT