Haris Rauf Controversy BJP Post Dainik Gomantak
देश

Haris Rauf Controversy: हारिस रौफने सीमारेषेवर उभं राहून केलं 'ते' घाणेरडं कृत्य; भाजपनं व्हिडिओ पोस्ट करत दिलं सडेतोड उत्तर Watch Video

Haris Rauf Controversy BJP Post: भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सनी विजय मिळवला असला तरी, सामन्यातील एका घटनेमुळे वातावरण अधिक पेटलं आहे.

Sameer Amunekar

आशिया कप २०२५मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने फक्त मैदानावरील खेळामुळेच नव्हे तर वादग्रस्त प्रसंगामुळेही मोठी चर्चा निर्माण केली आहे. रविवारी झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सने विजय मिळवला. परंतु सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने वातावरण अधिक पेटलं आहे.

२१ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना अपमानास्पद हावभाव केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो प्रेक्षकांकडे पाहून "विमान कोसळल्याचा" इशारा देताना दिसतो. त्याचबरोबर त्याने सहा बोटे दाखवत पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाडल्याचा दावा केलेल्या "सहा भारतीय लढाऊ विमानांचा" संदर्भ दिल्याचे स्पष्ट होत आहे.

या घटनेवर भारतीय चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवक जोरदार टीका केली जात असून, अनेकांनी याला "असभ्य वर्तन" आणि "क्रीडाभावनांना धक्का" असे संबोधले आहे.

दरम्यान, भाजपनेही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक प्रति-व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये हारिस रौफचे हावभाव दाखवल्यानंतर पाकिस्तानातील एका स्फोटाचे दृश्य दाखवले गेले असून, भाजपने दावा केला आहे की रौफचा उद्देश प्रत्यक्षात पाकिस्तानात झालेल्या त्या स्फोटाचा संदर्भ देण्याचा होता. पोस्टमध्ये लिहिलंय की, "भारताविरुद्ध खेळताना अशा प्रकारचे हावभाव करणे हे पाकिस्तानची मानसिकता दर्शवते."

क्रिकेटच्या मैदानावर मात्र भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत चाहत्यांचा दिलासा केला. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत भारतासमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी स्फोटक खेळ करत हे आव्हान केवळ सात चेंडू शिल्लक असताना सहज पूर्ण केले. भारताने सहा विकेट राखून विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

SCROLL FOR NEXT