Goa Beach Shack: शॅक उभारणी सुरू! UK, डेन्मार्कचे पर्यटक येणार; पर्यटन हंगाम ठरणार लाभदायक

Goa Tourism: यंदा पर्यटन खात्याने शॅक मालकांना परवाने ऑगस्ट महिन्यातच दिले, तसेच किनाऱ्यावरील शॅकांसाठीच्या जागांचं सीमांकनाचं कामही ऑगस्ट महिन्यातच पूर्ण केलं.
Goa Tourism Decline
Goa Beach Shack, Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: यंदा पर्यटन खात्याने शॅक मालकांना परवाने ऑगस्ट महिन्यातच दिले, तसेच किनाऱ्यावरील शॅकांसाठीच्या जागांचं सीमांकनाचं कामही ऑगस्ट महिन्यातच पूर्ण केलं. त्यामुळे ऑक्टोबर महिना सुरू होण्यापूर्वीच शॅक मालकांनी आपल्या शॅकच्या उभारणीचं काम सुरू केलं आहे.

गोवा शॅक मालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष व शॅक मालक क्रुझ कार्दोज यांनी सांगितले की, पर्यटन खात्याने परदेशात जाऊनही गोव्यातील पर्यटन मोसमाची जागरूकता वाढवली आहे. त्यामुळे युनायटेड किंगडम, डेनमार्क व इतर देशांतील पर्यटकांकडून विचारपूस सुरू झाली आहे.

त्यामुळे यंदाचा पर्यटन मोसम आमच्यासाठी म्हणजेच शॅक मालकांसाठी फायद्याचा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मोसम उशिरा सुरू झाला होता. डिसेंबर २४ ते जानेवारी २५ या दोन महिन्यांत तसेच मे २०२५ च्या शेवटी चांगला व्यवसाय झाला.

Goa Tourism Decline
Goa Beach: ...गोवावाले बीचपे! किनारे सजायला सुरुवात; व्यावसायिकांची लगबग सुरू

यंदा परवाना ३१ मेपर्यंत देण्यात आला असून, विनंती करून मुदत आणखी १०–१५ दिवसांनी वाढवता येते, असेही कार्दोज यांनी स्पष्ट केले. शॅकांसाठीच्या जागांचं सीमांकनाचं काम केळशी, बाणावली, कोलवा, बेताळभाटी या किनारपट्ट्यांवर पूर्ण झाले आहे.

Goa Tourism Decline
Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

यंदा सरकारने आम्हाला पर्यटन खात्यामार्फत आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः यात लक्ष घालत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शॅक मालकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांना गोव्यातील पर्यटनात वाढ हवी आहे, असेही कार्दोज यांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com