Goa Drug Case: उडता गोवा! राज्यात 10 दिवसांत 70 लाखांचा गांजा जप्त

Goa Police Action Against Drugs: गोवा पोलिसांनी वास्को, मडगाव, फातोर्डा अशा काही ठिकाणी छापेमारी करून गांजा जप्त केला आहे.
Goa narcotics bust | Drugs worth 70 lakh Goa
Goa drug case newsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोवा पोलिसांनी गेल्या दहा दिवसांत अमलीपदार्थविरोधी आठ ठिकाणी केलेल्या छापेमारीत सुमारे ७० लाख रुपयांचा ७ किलो गांजा जप्त केला.

अमली पदार्थ तस्करी, विक्री आणि सेवन खपवून घेतले जाणार नाही, गावागावांत पोलिसांकडून अमलीपदार्थविरोध मोहीम सुरू राहील, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली. वर्मा यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी पोलिस अमली पदार्थविरोधी छापेमारी करत आहेत.

Goa narcotics bust | Drugs worth 70 lakh Goa
डिकॉस्ता X गावकर! गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून गणेश गावकर मैदानात

वास्कोत गेल्याच आठवड्यात तिघांना गांजासह रंगेहाथ पकडून नंतर त्यांना गांजा पुरवणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी ओडिसा येथे पकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच मडगाव, फातोर्डा अशा काही ठिकाणी छापेमारी करून गांजा जप्त केला आहे.

एकूण आठ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत एका ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात गांजा सापडला, अशी माहिती अधीक्षक वर्मा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com