Haridwar Crime Dainik Gomantak
देश

Haridwar Crime: माय-लेकीच्या नात्याला काळिमा! आईनेच पोटच्या लेकीला ढकलले नराधमांच्या जबड्यात, बॉयफ्रेंडला करायला लावला अत्याचार

Haridwar: उत्तराखंडमधील हरिद्वार येथे माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका क्रूर आईने तिच्या प्रियकराला तिच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करायला लावले.

Sameer Amunekar

हरिद्वार: उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. "आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी जीवाचीही पर्वा करत नाही," असं म्हटलं जातं. परंतू येथे एका आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचा सौदा केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीच्या आरोपानुसार तिच्या आईने स्वतःच्या प्रियकराकडून आणि त्याच्या मित्राकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करवून घेतले.

विशेष म्हणजे पिडित मुलीची आई ही महिला भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष राहिलेली आहे. हरिद्वार पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत तिला आणि तिच्या प्रियकर सुमित पटवालला अटक केली आहे. या घटनेतील तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

पीडित मुलगी गेल्या महिन्याभरापासून तिच्या वडिलांसोबत राहत होती. घरात ती गेल्या काही दिवसांपासून सतत गप्प राहात होती, त्यामुळे तिच्या वडिलांनी विचारपूस केली. यावेळी तिने जो खुलासा केला तो हादरवणारा होता.

मुलीने सांगितले की, तिच्या आईनेच तिला तिच्या प्रियकर सुमित आणि अजून एका व्यक्तीकडून आपल्यावर लैंगिक अत्याचार करायला लावलं.

वडिलांचा आरोप आहे की गेल्या जानेवारीमध्ये, मुलीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने, पत्नी तिच्या प्रियकर आणि त्याच्या मित्राला घेऊन गेली, जिथे दारू पिऊन दोघांनीही अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने धमकी देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आग्रा, वृंदावन आणि हरिद्वार येथील हॉटेलमध्येही तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. जर कोणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही मुलीला देण्यात आली होती.

घटनेनंतर भाजपनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, आरोपी आईची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. घटनेनंतर संपूर्ण भागात संतापाची लाट पसरली असून, मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा घटनांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि महिला संघटनांनी केली आहे.

आईसारखी रक्षक व्यक्तीच जर अशा अमानवी कृत्यास प्रवृत्त होईल, तर समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे, असंही मत व्यक्त करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

SCROLL FOR NEXT