Goa Electricity: उत्तर-दक्षिण गोव्‍यातील वीज वहन झाले सोपे; धारबांदोडा-शेल्डे 220 किलोवॅट वाहिनी, वीज उपकेंद्र कार्यान्वित

Dharbandora Xeldem transmission line: गोव्यातील वीज ग्रीड आता अधिक सक्षम व स्थिर करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण‍ पाऊल उचलण्यात आले आहे.
Goa Electricity Transmissio
Dharbandora Xeldem transmission lineDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात आणि दक्षिण गोव्‍यातून उत्तर गोव्यात वीज वहन करणे आता सुलभ झाले आहे. धारबांदोडा-शेल्डेदरम्यान २२० किलोवॅट वाहिनी यशस्वीरीत्या कार्यान्वित झाल्यानंतर ही उपलब्‍धी साधली गेली आहे.

गोव्यातील वीज ग्रीड आता अधिक सक्षम व स्थिर करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण‍ पाऊल उचलण्यात आले आहे. धारबांदोडा आणि शेल्डे उपकेंद्रांदरम्यान २२० केव्ही क्षमतेच्या नव्या वीजवाहिनीतून यशस्वीरीत्या चाचणीप्रवाह पूर्ण झाला आहे. रेझोनिया लिमिटेडच्या गोवा-तम्नार ट्रान्समिशन प्रकल्पाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे राज्यातील घरगुती व औद्योगिक वीजपुरवठा अधिक स्थिर व विश्वासार्ह होण्यास हातभार लागणार आहे.

या नव्या वाहिनीच्या कार्यान्वयनामागे दक्षिण गोव्यातील वीज गरजा आणि उत्तर गोव्याशी असलेले वीज जाळे यामध्ये समन्वय साधण्याचा दृष्टिकोन आहे. सध्या गोव्याला मुख्यतः उत्तर भागातून, विशेषतः महाराष्ट्रातील केंद्रीय वीज ग्रीडमधून वीजपुरवठा केला जातो. दक्षिण गोव्यासाठी वीजपुरवठा मोले या एकमेव मार्गावर अवलंबून आहे, जो पुरेसा नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा वाढत्या मागणीनुसार दक्षिण गोव्यातील गरज पूर्ण करण्यासाठी उत्तर गोव्यातून वीज देणे शक्य व्हावे, यासाठी ही वाहिनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गोवा-तम्नार प्रकल्पाच्या इतर टप्प्यांमध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये ४०० केव्ही म्हापसा-धारबांदोडा वीजवाहिनी आणि ४००/२२० केव्ही क्षमतेचे धारबांदोडा उपकेंद्र यांचे यशस्वी उर्जीकरण झाले. त्यानंतर ५३ किलोमीटर लांबीच्या दोन स्वतंत्र ४०० केव्ही शेल्डे-म्हापसा वाहिनी आणि दोन ५०० एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर असलेले धारबांदोडा जीआयएस उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

Goa Electricity Transmissio
Sudin Dhavalikar: ..विरोधकांनी दिशाभूल केली! गोव्यात 'एक कोटी' घरांना फायदा; 'सोलर फार्म'साठी पुढाकार घेण्याचे वीजमंत्र्यांचे आवाहन

‘तम्नार’ ठरणार उत्तर गोव्‍यासाठीही लाभदायक

या सर्व प्रकल्पांमुळे गोव्याच्या वीज ग्रीडची स्थिरता, कार्यक्षमतेत वाढ आणि दीर्घकालीन औद्योगिक व नागरी विकासाच्या दृष्टीने भक्कम पाया निर्माण होणार आहे. भविष्यात ‘तम्नार’ प्रकल्पातून जेव्हा वीजपुरवठा सुरू होईल, तेव्हा त्याचा उपयोग केवळ दक्षिण गोव्यासाठी नव्हे तर उत्तर गोव्याला वीज पुरवण्‍यासाठीही होणार आहे. हा प्रकल्प गोव्याच्या ऊर्जाविषयक स्वयंपूर्णतेकडे जाणाऱ्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आधुनिक व सक्षम वीज पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीचा एक आदर्श नमुना ठरत आहे.

Goa Electricity Transmissio
Electricity Rates: नागरिकांचे वीज कनेक्शन कापले जाते, धनदांडग्यांना सवलत मिळते; 'ग्रीन एनर्जी'च्या स्वप्नामध्ये दरवाढीचा चटका

‘वीज मीटर योग्‍य ठिकाणी बसवा’

राज्यातील तब्बल ३२ हजारांपेक्षा अधिक वीजग्राहकांच्या घरी असलेल्‍या मीटरांपर्यंत वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नसल्याचे समोर आले आहे. केवळ दोन हजार घरांनीच वीज खात्याच्या विनंतीनुसार मीटर योग्‍य ठिकाणी स्थलांतरित केल्याची माहिती मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी दिली. मीटरवाचकांना आकडे पाहण्यास न मिळणारे मीटर हे खात्यापुढे मोठे आव्हान बनले आहे. अशा प्रकरणांमध्ये वीज वापराचे अचूक मोजमाप होऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com