Happy Holi 2025 Wishes In Marathi Dainik Gomantak
देश

Happy Holi 2025 Wishes: होळीनिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Happy Holi Wishes In Marathi: होळी सण हा भारतातील एक प्रमुख आणि आनंदाचा उत्सव आहे.

Sameer Amunekar

Happy Holi 2025 Wishes In Marathi

होळी सण हा भारतातील एक प्रमुख आणि आनंदाचा उत्सव आहे. हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. होळीचा मुख्य उद्देश वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

होलिका दहन

पुराणानुसार, भक्त प्रल्हाद आणि त्याचा अत्याचारी पिता हिरण्यकश्यप यांची कथा प्रसिद्ध आहे. हिरण्यकश्यपाने आपल्या बहिणीला—होलिकेला—प्रल्हादाला अग्नीत जाळून मारण्याचा आदेश दिला. परंतु, होलिका स्वतः जळून खाक झाली आणि प्रल्हाद वाचला. त्यामुळे वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते.

धूलिवंदन (रंगपंचमी)

या दिवशी लोक एकमेकांवर रंग टाकून आनंद साजरा करतात. हा दिवस माफक आनंद, सौहार्द आणि बंधुत्व वाढवण्याचा असतो. श्रीकृष्ण आणि राधेच्या रंगांच्या खेळाशी हा सण जोडलेला आहे.

होळीनिमित्त शुभेच्छा संदेश Holi Wishes In Marathi

होळीच्या निमित्ताने तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस आणि शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारासोबत हा रंगांचा सण साजरा करू शकता. येथे काही सुंदर होळी शुभेच्छा संदेश तुमच्यासाठी आम्ही आणले आहेत.

  • रंग खेळू आनंदाचा, सण साजरा प्रेमाचा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • रंग बरसू देत मनामध्ये, आनंद दरवळू देत जीवनामध्ये! होळी हप्पी होळी!

  • रंग प्रेमाचे, रंग आनंदाचे, रंग स्नेहाचे… या होळीला तुमच्या आयुष्यात येवो रंगीत दिवस!

  • गुलालाचा गंध आणि पाण्याचे तुषार, या सणात मिळवू आनंद अपार! होळीच्या शुभेच्छा!

  • बदला जुने रंग, आणा नवे उमंग, होळीचा उत्सव साजरा करू या धुंद!

  • होळीचे रंग, प्रेमाचे संग, नात्यांमध्ये येऊ दे नवे तरंग!

  • जीवन रंगीत असो, दुःखाचा एकही रंग नसो! होळीच्या शुभेच्छा!

  • रंग गुलाल उधळा, मनात आनंद साठवा, होळीच्या रंगात न्हाला!

  • ही होळी तुमच्या आयुष्यात आनंदाचे इंद्रधनुष्य घेऊन येवो! शुभेच्छा!

  • होळीच्या रंगात तुमच्या स्वप्नांना नवे रंग मिळू देत! हॅप्पी होळी!

  • होळीचा रंग आयुष्यात सुख-समाधान घेऊन येवो! होळीच्या शुभेच्छा!

  • संकट जळून जाऊ दे, आनंद फुलू दे! होलिकादहनाच्या शुभेच्छा!

  • होळीच्या धगधगीत जळू दे वाईट विचार, नवा दिवस येवो आनंदाचा!

  • सण हा रंगांचा, सण हा आनंदाचा, साजरा करू उत्साहाचा! शुभ होळी!

  • स्नेहाचा रंग, प्रेमाची छटा, नात्यात भरा आनंदाचा फुलोरा!

  • रंग उमलू देत, हसू फुलू देत, आयुष्याची होळी रंगतदार होऊ देत!

  • पाणी वाचवा, पर्यावरण सांभाळा, आनंदाने होळी साजरी करा!

  • गोड गोड गुझिया खा, रंग खेळा, होळीचा उत्सव दणक्यात साजरा करा!

  • स्नेहाच्या गुलालाने तुमचे जीवन रंगीत होवो! हॅप्पी होळी!

  • या होळीला दुःख जळू दे आणि आनंदाचे नवीन रंग उधळू दे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT