Sameer Amunekar
गोव्यातील धुळवड (शिमगोत्सव) म्हणजे रंग, नृत्य, संगीत आणि परंपरांचे अनोखे मिश्रण. जर तुम्हाला गोव्यात शिमगा सणाचा आनंद घ्यायचा असेल, तर खालील 5 ठिकाणे तुमच्या यादीत असायलाच हवीत.
पणजीत धुळवडीच्या दिवशी फोंसाच्या रस्त्यावर पर्यटक आणि स्थानिक एकत्र येऊन रंगांची होळी खेळतात. DJ म्युझिक, पारंपरिक नृत्य आणि जल्लोषाने न्हालेल्या रस्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो.
मडगावमध्ये पारंपरिक शिगमो उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. भव्य मिरवणुका, पारंपरिक ढोल-ताशे, आणि रंगांचा जल्लोष तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल.
पर्वरी येथे आयोजित होणारा 'रंगतरंग' हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध होलिका फेस्टिव्हल आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात, जिथे DJ नाईट्स, लाइव्ह म्युझिक आणि रंगांची उधळण पाहायला मिळते.
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर रंगांची होळी हा एक वेगळाच अनुभव असतो. हणजूण बीचवर अनेक हॉलिडे रिसॉर्ट आणि बीच क्लबमध्ये स्पेशल होळी पार्टी आयोजित केली जाते.
वास्कोत होळी उत्सवात पारंपरिक वेशभूषा, ढोलताशे, आणि विविध प्रकारचे नृत्यप्रकार येथे पाहायला मिळतात. स्थानिक कलेचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे ठिकाण परफेक्ट आहे.