Khaled Mashal Dainik Gomantak
देश

Kerala मध्ये Hamas ची एन्ट्री, पॅलेस्टाईन समर्थक रॅलीत हमासचा म्होरक्या सहभागी; भाजप आक्रमक

Save Palestine Rally: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, केरळमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Manish Jadhav

Save Palestine Rally: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, केरळमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. हमास या दहशतवादी संघटनेने केरळमध्ये प्रवेश केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

खरे तर, या महिन्यात 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणार्‍या हमासच्या एका म्होरक्याने केरळमधील मलप्पुरममध्ये सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंटने आयोजित केलेल्या रॅलीत कथितरित्या हजेरी लावली होती. सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंट ही जमात-ए-इस्लामीची युथ विंग आहे.

या रॅलीला हमास या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याने संबोधित केले. विशेष म्हणजे, त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हमासचा म्होरक्या खालेद मशाल (Khaled Mashal) उपस्थितांना संबोधित करताना दिसत आहे.

हमासच्या दहशतवाद्यांना तो 'योद्धा' म्हणतो

दरम्यान, हमासच्या (Hamas) सहानुभूतीदारांनी आयोजित केलेल्या रॅलीत मशालच्या व्हर्च्युअल भाषणाचा निषेध करत, भारतीय जनता पक्ष (भाजप) केरळ युनिटचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी केरळ पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी तात्काळ रॅलीच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये सुरेंद्रन यांनी लिहिले की, 'हमास नेता खालेद मशाल याचे मलप्पुरममधील एकता कार्यक्रमातील व्हर्च्युअल भाषण चिंताजनक आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे केरळ पोलीस कुठे आहे?

'सेव्ह पॅलेस्टाईन' रॅलीच्या नावाखाली दहशतवादी भाषण देत आहेत. तो त्याच्या संघटनेचा गौरव करत आहे. तो हमासच्या दहशतवाद्यांना 'योद्धा' म्हणत आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.'

काँग्रेस नेते शशी थरुर यांची ‘हमास समर्थक’ कार्यक्रमात हजेरी

दरम्यान, केरळ भाजपने (BJP) शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणीचे (CWC) सदस्य आणि लोकसभा खासदार शशी थरुर यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या रॅलीला हजेरी लावल्याबद्दल टीका केली आणि हा एक "हमास समर्थक" कार्यक्रम असल्याचे म्हटले.

एक दिवसानंतर हजारो आययूएमएल युद्धग्रस्त पॅलेस्टाईनमधील लोकांशी सॉलिडॅरिटी दर्शवण्यासाठी कोझिकोडच्या रस्त्यावर उतरले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन म्हणाले की, "राज्यात सांप्रादायिक तणावाला खतपाणी घालण्यासाठी या संघर्षाचा वापर केला जात आहे."

भारतविरोधी घोषणा

कोझिकोडमधील आययूएमएल रॅली "हमास समर्थक" होती आणि संपूर्ण कार्यक्रमात भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेत्याने असा आरोप केला की, रॅलीमध्ये थरुर यांचा सहभाग हा या विषयावरील भारताच्या भूमिकेच्या विरोधात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT