Gujrat and Himachal Pradesh Election Result Dainik Gomantak
देश

Gujrat-Himachal Pradesh Election Result : गुजरात-हिमाचलसाठी मतमोजणी सुरू; निवडणुकीतील 10 मुख्य अपडेट्स घ्या जाणून

संपूर्ण देशाचे या राज्यांच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमन्तक

हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर आणि गुजरात मध्ये 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. आज 8 डिसेंबरला दोन्ही राज्यांची मतमोजणी सुरू आहे. संपूर्ण देशाचे या राज्यांच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

एक्झिट पोलने पंतप्रधानांच्या गृहराज्यात आणि हिमाचलमध्ये भाजपला कमी फरकाने विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या निवडणुकीतले 10 मुख्य मुद्दे जाणून घेऊया. (Gujrat-Himachal Pradesh Election Result)

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूक निकालांवरील 10 मोठे अपडेट्स

1. गुजरातमध्ये 182 जागा आहेत, बहुमताचा आकडा 92 आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागा असून विजयासाठी 35 जागा आवश्यक आहेत.

2. जवळपास तीन दशकांचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये सर्वांचे लक्ष अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या कामगिरीवर असणार आहे.

3. भाजपने काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये अनौपचारिकपणे आपला प्रचार सुरू केला होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांनी 30 हून अधिक सभा घेतल्या.

4. हिमाचल प्रदेशातही, भाजप दुसऱ्या टर्ममध्ये सहज विजय प्राप्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर अवलंबून आहे.

5. हिमाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींनी निवडणुकीपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आणि बिलासपूर येथे नवीन एम्स उघडले. अनेक पक्षांच्या होर्डिंगमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर गायब होते.

6. 'आप' गुजरात आणि दिल्लीवर केंद्रित करण्यासाठी हिमाचलमधील शर्यतीतून व्यावहारिकरित्या बाहेर पडले. गुजरातमध्ये केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक सभा घेतल्या.

7. एक्झिट पोलने भाकीत केले आहे की AAP केवळ गुजरातमध्ये आपली उपस्थिती नोंदवेल. पण गुजरातमध्ये 'आप'ने पाऊल ठेवल्याने गुजरातच्या राजकारणात बदल घडून येतील आणि भाजपला काँग्रेसपेक्षा अधिक चिकाटी आणि धोरणात्मक विरोधक समोर येतील.

8. कॉंग्रेस सध्या भारत जोडो यात्रेवर लक्ष केंद्रित करून आहे. त्यांनी 2017 मध्ये 77 जागा जिंकल्या होत्या. दिल्ली नागरी निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त नऊ जागा मिळाल्या.

9. गेल्या दोन वर्षात काँग्रेसने गुजरातमधून अहमद पटेल आणि माधवसिंह सोलंकी हे आपले दोन प्रमुख नेते गमावले. गुजरात काँग्रेसच्या नेत्यांसाठी अहमद पटेल हे मार्गदर्शक होते. 2017 मध्ये आघाडीचे नेतृत्व करणारे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त असल्याने यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसची बाजू पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

10. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला वाढत्या गटबाजीचा सामना करावा लागत आहे. निकालाच्या पूर्वसंध्येला पक्षाने 30 पदाधिकाऱ्यांची ‘पक्षविरोधी कारवायांसाठी’ हकालपट्टी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT