Gujarat and Himachal Election Result : गुजरातमध्ये भाजपची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

गुजरातमध्ये कमळ फुलले तर हिमाचलमध्ये कॉंग्रेसने मारली बाजी
Gujarat and Himachal Election
Gujarat and Himachal ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

देश खऱ्या अर्थाने आता युवकांच्या हातात

भाजपचे समर्थन म्हणजे युवकांना समर्थन आहे. त्यामुळे हा देश खऱ्या अर्थाने आता युवकांच्या हातात येतो आहे असे ही पंतप्रधान म्हणाले आहेत

आपली साथ आम्हाला लढण्यास बळ  देते - पंतप्रधान मोदी

गेल्या 70 वर्षात महिलांना ज्या प्रमाणात स्थान मिळायला हवे होते, ते मिळाले नाही. मात्र आता महिला सक्षमीकरणासाठी त्याहून अधिक कार्य भाजपने केले आहे. तसेच आपली साथ आम्हाला लढण्यास बळ देते असे ते म्हणाले

देशातील सर्व वर्गांची भाजपला पसंती

भारत देशातील आदिवासी समुदाय, गरीब, श्रीमंत शेतकरी, मजुर सर्व वर्गातून भाजपला पसंती मिळत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

भाजपमध्ये कठोर निर्णय घेण्याची ताकद आहे - पंतप्रधान मोदी

हा निवडणूक निकाल अशा वेळी आला आहे, जेव्हा भारताने अमृत काळात प्रवेश केला आहे. यावरुन येणारी 50 वर्षे केवळ विकासाचे राजकारण होईल. भाजपला मिळालेला जनसमर्थन नव्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. असे ते म्हणाले. तसेच देशाच्या हिताचे सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपमध्ये असल्याने लोकांनी भाजपला मतदान केल्याचे पंतप्रधान म्हणाले.

गुजरातच्या जनतेने विक्रम मोडल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा

देशात घराणेशाहीविरोधात जनक्षोभ वाढत आहे. यावेळी गुजरातने देखील आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. विशेषत: मी गुजरातच्या जनतेला नमन करतो. कारण नरेंद्रचा विक्रम मोडायला हवा, असे मी गुजरातच्या बंधू-भगिनींना सांगितले होते. तर त्यांनी गुजरातच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचे ते म्हणाले.

तरुणांनी भाजपच्या कामावर विश्वास ठेवला- पंतप्रधान मोदी

तरुण तेव्हाच मतदान करतात, जेव्हा त्यांना सरकारचे काम प्रत्यक्षात दिसते. त्यामुळेच आज तरुणांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले. याचा अर्थ तरुणांनी आमच्या कामाची चाचपणी केली आणि त्यावर विश्वास ठेवला. तरुणांना विकास हवा आहे.

येत्या 25 वर्षात फक्त विकासाचे राजकारण - पंतप्रधान मोदी

आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील 25 वर्षात फक्त विकासाचे राजकारण करण्यात येणार आहे. असे म्हटले आहे. तसेच हिमाचलमध्ये भाजप केवळ एक टक्क्यानेच मागे आहे असल्याचे म्हटले आहे

दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदींचे आगमन

गुजरातमध्ये भाजपने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे येथे आगमन झाले असून उपस्थितांना व्हिक्टरी साईन दाखवून मोदींनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा देखील होते. थोड्यात वेळात पंतप्रधान मोदी गुजरात निकालावरून संबोधित करणार आहेत.

देशात नरेंद्र, गुजरातमध्ये भूपेंद्र; मोदींचे भाकीत ठरले खरे...

यंदा मात्र भूपेंद्र पटेल यांनी हे सर्व विक्रम मोडत 156 जागा जिंकून नवा विक्रम नोंदवला आहे. गुजरातच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

PM मोदी म्हणाले, 'थँक्स गुजरात...'

गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. थँक्स गुजरात, असे ट्विट त्यांनी केले. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे, असे मोदी म्हणाले.

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, गुजरात निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि गुजरातच्या लोकांनी आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्ष बनवले आहे. आम्हाला मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार 'आप' हा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. देशात असे काही पक्ष आहेत, ज्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये नवा इतिहास रचला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये नवा इतिहास रचला आहे. भाजपला अपेक्षित विजय मिळाला आहे. काँग्रेसचा सफाया झाला असून, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलेला 'आप' चा नवा चेहरा तोंडघशी पडला आहे.'

गांधीधामच्या काँग्रेस उमेदवाराने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. थँक्स गुजरात, असे ट्विट त्यांनी केले. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे, असे मोदी म्हणाले.गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. थँक्स गुजरात, असे ट्विट त्यांनी केले. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे, असे मोदी म्हणाले.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. थँक्स गुजरात, असे ट्विट त्यांनी केले. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे, असे मोदी म्हणाले.गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. थँक्स गुजरात, असे ट्विट त्यांनी केले. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे, असे मोदी म्हणाले.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. थँक्स गुजरात, असे ट्विट त्यांनी केले. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे, असे मोदी म्हणाले.केजरीवाल म्हणाले, गुजरातच्या जनतेने 'आप' ला राष्ट्रीय पक्ष बनवला

गांधीधामच्या काँग्रेस उमेदवाराने मतमोजणीच्या वेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित लोकांनी उमेदवाराला रोखले.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, गुजरातमध्ये भाजप 42 जागा जिंकून 115 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 3 जागा जिंकून 13 जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष 1 आणि आप 5 जागांवर आघाडीवर असून मतमोजणी सुरु आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले - ही निवडणूक खूप कठीण होती...

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, 'मी जनादेशाचा आदर करतो. ही निवडणूक खूपच कठीण होती. अत्यंत कमी फरकाने आम्ही जागा गमावल्या. हिमाचलच्या विकासात पंतप्रधान मोदींचे मोठे योगदान आहे.'

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा विजयी

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा जामनगरमधून (उत्तर) विजयी झाल्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.

भाजपने गुजरातमध्ये काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला

गुजरातमध्ये भाजपने सलग सातव्यांदा बहुमत मिळवून इतिहास रचला आहे.

हिमाचल प्रदेश निकालः हिमाचलमध्ये काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेस 40, भाजप 25 आणि अपक्ष उमेदवार 3 जागांवर आघाडीवर आहेत.

CM जयराम ठाकूर विक्रमी 7 व्यांदा विजयी

हिमाचल प्रदेशातील सराज या मतदारसंघातून CM जयराम ठाकुर यांनी काँग्रेसच्या चेतराम ठाकुर यांना विक्रमी 20 हजारहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. जयराम ठाकूर सातव्यांदा विजयी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये 3 मंत्री पराभूत

हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या मंत्रीमंडळातील तीन विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. डॉ. रामलाल मारकंडा हे लाहौल स्पिती येथून पराभूत झाले आहेत. त्यांना काँग्रेसच्या रवी ठाकूर यांनी पराभूत केले.

कांगडा जिल्ह्यातील शाहपूर येथून मंत्री सरवीन चौधरी या देखील पराभूत झाल्या. त्यांना काँग्रेसच्या केवल सिंह पठानिया यांनी पराभूत केले. तर नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांना शिमला जिल्ह्यातील कसुमपटी या मतदारसंघात काँग्रेसच्या अनिरूद्ध सिंह यांनी पराभूत केले.

आप ला मोठा धक्का! सीएम पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा पराभव

गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासोबतच आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांनाही आपली जागा वाचवता आली नाही आणि भाजपच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. आप ने खंभलिया विधानसभा मतदारसंघातून इसुदान गढवी यांना उमेदवारी दिली होती आणि ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते.

हिमाचलमध्ये कॉंग्रेसचा वरचष्मा कायम!

हिमाचल प्रदेशातील कल पाहता दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत थोडाफार फरक आहे, तरीही काँग्रेस पुढे गेली आहे. भाजपला 43.06 टक्के तर काँग्रेसला 43.77 टक्के मते मिळाली आहेत.

'हिमाचल'चा पहिला निकाल हाती;

हिमाचल विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सेराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर 20 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यातील ट्रेंडमध्ये भाजप अजूनही पिछाडीवर असून काँग्रेस पक्ष 38 जागांवर आघाडीवर आहे. 68 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी आज होत असून या निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे.

विजयाचा जल्लोष करतांना भाजप  प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्य भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांनी विजयाचा आनंद साजरा करतांना

गुजरातमधील पहिला निकाल जाहीर

निवडणूक आयोगाने गुजरातमधील पहिला निकाल जाहीर केला असून त्यात भाजपला यश मिळाले आहे. दाहोदमधून भाजपच्या कन्हैयालाल बच्चूभाई किशोरी यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे हर्षदभाई वालचंदभाई निनामा यांचा २९३५० मतांनी पराभव केला.

गुजरातमध्ये "भाजप अनब्रेकेबल" @27 वर्षे

सकाळपासून कलपाहता गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आहे. तसेच गुजरातचा 10 किंवा 11 डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्याता असून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, विनोद तावडेंची बैठक सुरू

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, विनोद तावडेंची बैठक सुरू झाली आहे. हिमाचलमध्ये लढत एकदम रंगत होत आहे. अशातच काठावर आकडे असल्यामुळे इतर शक्यतांची पडताळणी सुरू झाली आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवेल : नाना पाटोले

हिमाचलमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताचं सरकार बनवेल आणि लोकसभेत चांगले प्रदर्शनही करेल. भय निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक झालं आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेस विजयाच्या जवळ; काँग्रेस भाजपमध्ये चढाओढ

हिमाचलप्रदेश मध्ये काँग्रेस 38 जागांवर आहे तर भाजप 26 आणि अपक्ष 3 जागांवर आहे. आपला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे ही लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच दिसून येत आहे.

जडेजाच्या पत्नीच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार

उत्तर जामनगरमधून रिवाबा जडेजा आघाडीवर आहेत. रिवाबा जडेजाने तिचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे उमेदवार करसनभाई कर्मूर यांच्यावर १२०२७ मतांची आघाडी घेतली आहे.

हिमाचल प्रदेशचा पहिला निकाल हाती

हिमाचल प्रदेशचा पहिला निकाल हाती आला आहे. सुंदरनगरमधून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. सुंदरनगरमधून भाजपचा उमेदवार राकेश कुमार विजयी झाले आहेत.

गुजरातमधील भाजप कार्यालयात उत्साहाचे वातावरण

भाजपने एकूण 182 जागांपैकी 149 जागांवर आघाडी घेतल्याने गांधीनगर भाजप कार्यालयात उत्सव

गुजरातमध्ये प्रो-इन्कम्बन्सी, मोदींची जादू कायम

गुजरातमध्ये प्रो-इन्कम्बन्सी आहे. आम्ही गुजरातमध्ये नवा विक्रम रचत आहोत कारण राज्यातील जनतेचा पंतप्रधान मोदींवर अपार विश्वास आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आघाडीवर

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडियामधून एकूण 23,713 मतांनी आघाडीवर आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपमध्ये काँटे की टक्कर; अपक्ष ठरवणार भविष्य?

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. पण अपक्ष यामध्ये महत्वाचा मुद्दा ठरेल असे दिसून येत आहे. काँग्रेस भाजपमध्ये अपक्षांची बाजू मोलाची ठरणार आहे.

गुजरातमध्ये मोदींची जादू कायम

गुजरातमध्ये भाजप कार्यालया बाहेर विजयाचा आनंद ढोल-ताश्याच्या गजरात कार्यकर्ते साजरा करत आहेत.

गुजरातमध्ये भाजप तोडणार रेकॉर्ड

भाजप 182 पैकी 146 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 23 जागांवर मर्यादित असल्याचे दिसत आहे. काही जागांवर आम आदमी पक्षाकडून चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्ष आता 9 जागांवर पुढे आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.

संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

आप-भाजपमध्ये साटलोटं असे म्हणत राऊतांनी भाजपवर आरोप केला आहे. आपनं दिल्ली घेतली, गुजरात भाजपला सोडलं असेही ते म्हणाले आहे.

गुजरातमध्ये ७व्यांदा कमळ फुलण्याचे संकेत

भाजप आघाडीवर असल्याने गांधीनगरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आनंद साजरा करतांना दिसत आहे.

गुजरातमध्ये हार्दीक पटेल आघाडीवर

भाजप नेते आणि वीरमगाम मतदारसंघाचे उमेदवार हार्दीक पटेल केवळ 300 मतांनी आघाडीवर आहेत. येथे कँग्रेस उमेदवार आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे.

गुजरातमध्ये सुरुवातीच्या कलांनुसार खालील उमेदवार आघाडीवर

  • दर्शना वाघेला , भाजप

  • पायल कुकरानी, भाजप

  • कौशिक जैन, भाजप

  • हार्दिक पटेल, भाजप

  • नरेश व्यास, भाजप

  • इमरान खेडावाला, काँग्रेस

  • कनुभाई देसाई, भाजप

जडेजाची बायको भाजपचा गड राखणार

जामनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आघाडीवर आहेत. आपचे उमेदवार आणि पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा इसुदान गढवी हेही खंभलिया मतदारसंघातून पुढे झाले आहेत.

नवसारी, गानदेवी, जलालपूरमध्ये भाजप तर वांसदामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सध्या केवळ ३९ जागांसाठीच कल दाखवण्यात आला आहे. यामध्ये भाजप 30, काँग्रेस पाच आणि आम आदमी पार्टी 4 जागांवर आघाडीवर आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेसने मारली मजल; भाजप पिछाडीवर

हिमाचालमध्ये काँग्रेसने मजल मारली असून भाजप पिछाडीवर गेले आहे. आता काँग्रेस 35 जागांवर आहे तर भाजप 32 जागांवर उत्सुकता शिगेला पोहचत आहे. ही अटीतटीची लढत आणखी रंजक होण्याची शक्यता आहे.

हिमाचलमध्ये कमळ फुलणार ; मोहित कंबोज

हिमाचालमध्ये भाजप 33 जागांवर आहे तर काँग्रेस 34 जागांनी आघाडीवर आहे. ही लढत जोराची होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने अशीच आघाडी ठेवली तर हिमाचालमधील राजकीय दृश्य बदलण्याची शक्यता आहे. अशातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी हिमाचालमध्ये भाजपच जिंकणार असं ट्विट केलं आहे.

हिमाचालमध्ये काँग्रेसची मोठी आघाडी; तर आपला एकही जागा नाही

हिमाचालमध्ये भाजप 33 जागांवर आहे तर काँग्रेस 34 जागांनी आघाडीवर आहे. ही लढत जोराची होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने अशीच आघाडी ठेवली तर हिमाचालमधील राजकीय दृश्य बदलण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये १२८ जागांवर भाजप आघाडीवर

गुजरातमध्ये आप केवळ ५ जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमधील मोरबीमध्ये भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. साबरकांठातील हिंमतनगर जागेवर काँग्रेस पुढे, प्रांतिजमध्ये तर इडरमध्ये भाजप पुढे आहे. मेहसाणामध्ये पहिल्या फेरीअखेर कडी जागेवर काँग्रेस, मेहसाणा जागेवर भाजप, उंजा जागेवर भाजप, विसनगर जागेवर भाजप, खेरालूमध्ये काँग्रेस, बेचराजीत काँग्रेस, तर विजापूरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. मेहसाणाच्या विसनगर मतदारसंघातून आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल पुढे आहेत.

हिमाचलप्रदेशमध्ये काटे की टक्कर

भाजप - 32

कॉंग्रेस - 33

आप - 00

इतर - 03

गुजरातमध्ये सुरुवातीच्या टप्पयात भाजपला स्पष्ट बहुमत

भाजप - १२५

कॉंग्रेस - ५२

आप - ४

इतर -

पुन्हा भाजप येईल- हार्दिक पटेल

भाजप उमेदवार हार्दिक पटेल पुन्हा भाजपची सत्ता येईल असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. निश्चितपणे १३५-१४५ जागांवर भाजप सत्ता स्थापन करेल. भाजप कामाच्या जोरावर पुन्हा निवडुण येईल. गेल्या २० वर्षात येथे एकही दंगल दहशतवादी हल्ला झालेला नाही. लोकांना माहिती आहे की, भाजपने त्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्या आहेत. त्यांनी भाजपलाच मतदान दिले आहे. कारण त्यांचे भविष्य सुरक्षित आहे.

जिग्नेश मेवाणी आघाडीवर

गुजरातमध्ये भाजप 100 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे. तर आप फक्त तीन जागांवर आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने श्रीगणेशा केला आहे. हिमाचालमध्ये भाजप 17 जागांवर आहे तर आयएनसी 13 जागांवर आहे. आपला आणखी एकही जागा मिळाली नाही.

गुजरातमध्ये  भाजपचा श्रीगणेशा

गुजरातमध्ये आपने खातं उघडले आहे. गुजरातमध्ये भाजप १८ जागांनी आघाडीवर असून कॉंग्रेस ६ जागांवर आघाडी आहे.

हिमाचलमध्ये मतमोजणीला सुरवात

दोन जागांवर भाजप आघाडीवर. गुजरामध्ये भाजपचा श्रीगणेशा झाला आहे. ५ जागांवर भाजप आघाडीवर असून कॉंग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे.

हिमाचलमध्ये कॉंग्रेसची १० जागांवर आघाडीवर आहेत,तर भाजपची ११ जागांवर आघाडी आहे.

गुजरात अन् हिमाचल मध्ये कोण बाजी मारणार?

गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat-Himachal) या दोन राज्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. या दोन्ही राज्यात सत्तेची सुत्र कोणाच्या हातात जाणार ते आज स्पष्ट होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशात निवडणुकीसाठी 10 हजार सुरक्षा रक्षक, निवडणूक अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत मतमोजणी होणार आहे. 59 ठिकाणी तयार करण्यात आलेल्या 68 मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. त्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएममशीन उघडल्या जातील.

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. 182 जागांसाठी गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली होती. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान झालं होतं. आज 37 मतदान केंद्रावर या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. सध्या गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. हिमाचल प्रदेशातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सत्ता राखणार की काँग्रेस बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com