Gujarat MLA Jignesh Mewani Dainik Gomantak
देश

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना जामीन मंजूर

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी (MLA Jignesh Mewani) यांना कोक्राझार कोर्टातून जामीन मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाममधील कोक्राझार कोर्टातून जामीन मिळाला आहे. गेल्या आठवड्यात आमदार जिग्नेश मेवाणी यांना अचानक अटक करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विरोधात ट्विट केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोक्राझार येथील न्यायालयाने रविवारी गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी (Gujarat MLA Jignesh Mewani) यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पंतप्रधानांविरोधात ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी मेवाणी यांना बुधवारी गुजरातमधून अटक केली होती. यानंतर ते तीन दिवस पोलिस कोठडीत होते.

दरम्यान, रविवारी सायंकाळी उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. रात्री 9.30 वाजेपर्यंत दोन तासांहून अधिक वेळ या प्रकरणी युक्तिवाद चालला. सीजेएम यांच्या निवासस्थानी या प्रकरणाची सुनावणी झाली. मेवाणी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने धरणे आंदोलन केले होते. रविवारी आसाम प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोरा, आमदार दिगंता बर्मन आणि एसके रशीद यांनी पक्ष कार्यालयापासून कोक्राझार पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढला.

तसेच, काँग्रेस समर्थित अपक्ष आमदार मेवाणी यांना बुधवारी रात्री गुजरातमधील (Gujarat) पालनपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर आसामधील कोक्राझार पोलीस ठाण्यात आयपीसी आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या कथित ट्विटवरुन एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, पीएम मोदी "गोडसेला देव मानतात".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT