Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Gujarat Election: 'मिशन गुजरात' निवडणुकीपूर्वी केजरीवालांनी कसली कंबर

दैनिक गोमन्तक

Gujarat Assembly election 2022: गुजरातमध्ये सध्या राजकीय घमासान सुरु आहे. वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप आणि आपसह सर्व पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यभरात नेत्यांचे वारंवार दौरे होत आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल येत्या काही दिवसांत गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. केजरीवालांनी या महिन्यात दोन वेळा गुजरात दौरा केला आहे.

पुढील महिन्यात गुजरातमध्ये अनेक दौरे

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात अरविंद केजरीवाल यांचे अनेक दौरे गुजरातमध्ये असतील. ते 1, 6, 7 आणि 10 ऑगस्ट रोजी गुजरात दौऱ्यावर असतील. दिल्लीपाठोपाठ पंजाबमधील नेत्रदीपक कामगिरीनंतर आप नेते आणि कार्यकर्ते गुजरात निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, आपली ताकद वाढवण्यासाठी अरविंद केजरीवाल या वर्षी होणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे डोळे लावून बसले आहेत.

गुजरातमधील सोमनाथ येथे सभेला संबोधित करतील

अरविंद केजरीवाल 1 ऑगस्ट रोजी गुजरातमधील सोमनाथ येथे एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर या महिन्यात त्यांचे अनेक दौरे आहेत. गुजरातमध्ये दोन दशकांहून अधिक काळ भाजपची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु भाजपला आव्हान देण्यात त्यांना अपयश आले. मिशन गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी आम आदमी पक्षाने पूर्ण तयारी केली आहे. यासाठी अरविंद केजरीवाल स्वतः आघाडीवर आहेत.

मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले

नुकतेच गुजरात दौऱ्यावर आलेल्या अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक मोठी घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, 'आता गुजरातला बदल हवा आहे. आम्ही गुजरातमध्येही मोफत वीज देणार आहोत.' गुजरातमध्ये (Gujarat) 24 तास वीज मिळावी यासाठी आपला प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले. 27 वर्षे एकाच पक्षाने राज्य केले, त्यामुळे अहंकार येतो, असे ते म्हणाले होते. आता गुजरातला बदल हवा आहे. महागाई वाढत आहे, विजेचे दर वाढत आहेत. दुसरीकडे, पंजाबमध्ये (Punjab) वीज मोफत करण्यात आली आहे. आता गुजरातमध्येही वीज मोफत केली जाईल, असेही केजरीवाल शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांसाठी सज्ज राहा! संदीप जॅकीस यांच्या सूचना

Panaji News : सांतिनेज खाडीतील गाळउपसा पूर्णत्वाकडे; साडेतीन किलोमीटरच्या जलप्रवाहाला पुनरुज्जीवित करणार

SCROLL FOR NEXT