Gudi Padwa 2025 Wishes In Marathi Dainik Gomantak
देश

Gudi Padwa 2025: नव्या संकल्पांची, नव्या उमेदीची सुरूवात; गुढीपाडव्याच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Gudi Padwa 2025 Wishes In Marathi: तुम्ही घर बसल्या तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना गुढीपाडव्याचे संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

Sameer Amunekar

Gudi Padwa Wishes In Marathi

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा सण असून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला हा सण येतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणं अत्यंत मंगलकारी मानले जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि संपूर्ण देशभरातील विविध भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. उदा. कर्नाटकमध्ये आणि आंध्र प्रदेशात ‘उगादी’, तर सिंधींमध्ये ‘चेटीचंद’ म्हणून ओळखला जातो.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने वसंत ऋतूचे स्वागत होते. झाडांना नवीन पालवी फुटते आणि निसर्ग फुलून येतो. या दिवसापासून नवे पीक उगवण्यास सुरुवात होते. गुढी उभारणे हा या सणाचा महत्त्वाचा भाग आहे. गुढी ही विजय, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानली जाते.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश Gudi Padwa Wishes In Marathi

  • नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढीपाडवा तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सुख-शांती घेऊन येवो.

  • गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष नवीन संधी घेऊन येवो आणि तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत.

  • आनंद, आरोग्य आणि भरभराटीने भरलेले नवीन वर्ष असो! गुढीपाडवा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मंगलमय जावो.

  • तुमच्या घरावर कायम लक्ष्मीचा वास असो, आरोग्य उत्तम राहो आणि सुख-समृद्धी लाभो! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

  • गुढी उभारू, नवचैतन्य साजरं करू! नवीन संधी, नवीन स्वप्न आणि नव्या ऊर्जा घेऊन आलेल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

  • हा सण तुमच्या आयुष्यात भरभराट, आनंद आणि सकारात्मकता घेऊन येवो! गुढीपाडवा उत्साहाने साजरा करा!

  • जीवनात नवीन उमेदीने, नव्या ऊर्जेने पुढे जा! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • नव्या क्षितिजांकडे वाटचाल करण्यासाठी नवीन संधी, नव्या स्वप्नांची पूर्ती आणि आनंदाची बरसात घेऊन आलेल्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • सोनेरी गुढी उभारूया, सुख-समृद्धीचे स्वागत करूया! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • नवीन संकल्प, नवीन स्वप्न आणि नव्या ऊर्जेने गुढीपाडवा साजरा करूया! शुभेच्छा!

  • घरादारात सुख-समृद्धी नांदो आणि तुमच्या जीवनात चैतन्य सळसळू दे! गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

  • सण आनंदाचा, सण उर्जेचा, सण शुभ संकल्पांचा! गुढीपाडवा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय जावो!

  • जीवनाच्या गुढीला सुखाची पताका लागो आणि भरभराटीचे सूर येऊ दे! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

  • संपन्नता, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो! गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • यशाची गुढी उभारूया, समृद्धीचा संकल्प करूया! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • नवीन विचार, नवी स्वप्नं आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा गुढीपाडवा मंगलमय जावो!

  • चैतन्य, भरभराट आणि शुभसंधी घेऊन आलेल्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

  • नवी आशा, नवी दिशा आणि नवा आनंद घेऊन आलेल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

  • तुमचे घर आनंदाने आणि समृद्धीने भरून जावो! गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • नवीन पर्व, नवीन ऊर्जा, आणि नवीन उत्साह घेऊन आलेल्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT