Sameer Amunekar
उन्हाळ्यात जंगलात फिरायला जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते, कारण उष्णता, पाणीटंचाई, वन्यजीव, आणि अपघातांची शक्यता अधिक असते. सुरक्षित आणि आनंददायी सफारीसाठी खालील महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा,
हलके, फिकट रंगाचे, आणि सुती कपडे घाला, हे उन्हाचा त्रास कमी करतात.
टोपी आणि गॉगल्स वापरा, डोके आणि डोळे उष्णतेपासून सुरक्षित राहतात.
चांगले ग्रीप असलेले बूट घाला. पायांना संरक्षण मिळेल आणि चालताना घसरणार नाही.Jungle Trip
किमान २-३ लिटर पाणी सोबत ठेवा. डिहायड्रेशन टाळण्यासाठी वारंवार पाणी प्या.
ओआरएस किंवा ग्लुकोज पावडर ठेवा. उष्णतेमुळे होणारी थकवा आणि अशक्तपणा कमी होईल.