Greater Noida Accident Dainik Gomantak
देश

Greater Noida Accident: पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी! ग्रेटर नोएडामध्ये भरधाव थारने स्कूटरला उडवले; भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Greater Noida Hit And Run Thar Accident: ग्रेटर नोएडाच्या बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटेरा भागात एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी हिट-एंड-रनची घटना समोर आली.

Manish Jadhav

Greater Noida Hit And Run Thar Accident: ग्रेटर नोएडाच्या बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटेरा भागात एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी हिट-एंड-रनची घटना समोर आली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (21 सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास नीरज हे आपल्या पत्नीसोबत स्कूटर क्रमांक UP16-EE-2569 वरुन जात होते. त्याचवेळी मागून अतिशय वेगात आलेल्या महिंद्रा थार गाडीने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटरचालक नीरज हवेत उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पडले, तर त्यांची पत्नी रस्त्यावर फेकली गेली. अपघाताची (Accident) माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान दुर्दैवाने नीरज यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सध्या सुदैवाने धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेची बातमी घरापर्यंत पोहोचताच कुटुंबात एकच हाहाकार उडाला आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

दरम्यान, घटना घडल्यानंतर संतापजनक बाब म्हणजे आरोपी चालक आपली थार गाडी घटनास्थळीच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ती थार गाडी जप्त केली असून, पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांनी मोठी मोहीम राबवली. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आरोपी चालकाला लवकरात लवकर हुडकून काढून त्याच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अलीकडच्या काळात देशात थार किंवा इतर मोठ्या एसयूव्ही गाड्यांच्या माध्यमातून होणाऱ्या हिट-एंड-रनच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे वाहतूक सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेपूर्वी अगदी अलीकडेच राजस्थानमधील जयपूर येथेही अशाच प्रकारची एक दुर्दैवी घटना घडली होती, जिथे भरधाव थार गाडीने एका स्कूटरस्वाराला चिरडले होते. सांगानेर भागात राहणारे 57 वर्षीय नवल शर्मा आपल्या कामासाठी स्कूटरवरुन बाहेर पडले असताना एका भरधाव थारने त्यांना मागून धडक दिली होती, ज्यामध्ये अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याशिवाय गुरुग्राममध्येही एका व्यक्तीने वादातून मित्रांच्या टॅक्सीला धडक दिल्यासारख्या घटना समोर आल्या आहेत. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने अशा सुस्साट आणि बेदरकार वाहनांवर वचक बसवण्यासाठी आणखी कडक नियम आणि कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बॉयफ्रेंड असू दे, पण त्याच्यासोबत लग्न नको'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलीला अजब सल्ला! स्वतः मात्र लहान वयात अडकली होती विवाहबंधनात

Goa Weathe: गोव्यात विजांसह वादळी वाऱ्याचा इशारा; पुढील तीन दिवस मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात यलो अलर्ट

Margao Municipal Land Dispute: ₹14.12 कोटींच्या पालिका मालमत्तेवरून वाद; बीपीएस स्पोर्ट्स क्लबच्या जमिनीप्रकरणी 'कॅव्हिएट' दाखल

OTP Banking Fraud: 'ओटीपी' शेअर केला अन् 80 हजार 855 रुपये गेले; बँकेविरोधातील ग्राहकाची तक्रार आयोगाने फेटाळली

'रोहित- विराट मैदानात खेळताना दिसले की मी...'; क्रिकेट दिग्गजाचं मोठं वक्तव्य, 2027च्या वर्ल्ड कपबाबतही केली मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT