Viral Dance Grandmother Dainik Gomantak
देश

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

Viral Dance Grandmother: सोशल मीडियावर सध्या एका 75 वर्षांच्या आजीबाईंचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Viral Dance Grandmother: सोशल मीडियावर सध्या एका 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजीचा उत्साह आणि ऊर्जा पाहून नेटकरी थक्क झाले. अनेकांनी तिच्या डान्सदरम्यानच्या उड्या पाहून हा व्हिडीओ AI इफेक्ट असल्याचा संशय व्यक्त केला. वयाच्या 75व्या वर्षीही आजीबाईचा उत्साह कमी झालेला नाही.

आधी हा व्हिडिओ पाहा!

जबरदस्त डान्स

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आजीबाई डान्स फ्लोअरवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि नृत्यशैली पाहून तिच्या वयाचा कोणताही अंदाज येत नाही. आजी केवळ डान्सच करत नाहीत, तर मधे-मधे उड्या मारुन आपल्या कलेचाही जलवा दाखवत आहे. तिच्या याच उड्या हायलाईट ठरल्या. 75व्या वर्षी इतका लवचीकपणा आणि सहजता पाहून यूजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यामुळेच अनेकजण हा व्हिडीओ AI तंत्रज्ञानाची कमाल असल्याचे म्हणत आहेत.

आत्मविश्वास आणि आनंदाची प्रेरणा

हा व्हिडीओ केवळ मनोरंजक नाही, तर तो सर्व वयोगटातील लोकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, आजीबाई जगाची कोणतीही चिंता न करता स्वतःच्या आनंदात पूर्णपणे मग्न आहेत. तिचा हा आत्मविश्वास आणि आनंदी स्वभाव लोकांना खूप आवडत आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले की, "जर आजी इतक्या ऊर्जेने डान्स करु शकत असेल, तर याचा अर्थ तिने 75 वर्षांच्या वयातही आपला छंद सोडला नाही." हा डान्स तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा बनला.

व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

आजीबाईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोकही त्यावर भरभरुन व्यक्त होत आहेत.

"वाह आजी क्या बात है!" अशा अनेक कमेंट्स करुन लोक आजीच्या जिद्दीला दाद देत आहेत.

या व्हिडीओने हे सिद्ध केले की, आयुष्यातील उत्साह आणि आवड कधीही कमी होत नाही. वय कितीही झाले तरी, जर मनात इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असेल, तर प्रत्येकजण आपल्या कलेला नवीन आणि खास पद्धतीने जगासमोर आणू शकतो, असे दुसऱ्याने म्हटले.

75 वर्षांच्या आजीबाईचा हा ऊर्जावान डान्स व्हिडीओ आजच्या पिढीला आपले छंद आणि स्वप्ने कधीही सोडू नयेत, अशी मोलाची शिकवण देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT