Dehradoon Police Arrests con man Lalit:
Dehradoon Police Arrests con man Lalit: Dainik Gomantak
देश

गोव्यातून दुसऱ्याच्याच नावाने घेतली पदवी; आसाममधून पॅनकार्ड, उत्तराखंडातून पासपोर्ट, 'मि. नटरवलाल'कडे 10 बनावट ओळखपत्रे

Akshay Nirmale

Dehradoon Police Arrests con man Lalit: उत्तराखंडातील पत्त्यावरून बनवला पासपोर्ट... आसाममधील तपशील देऊन बनवले पॅन कार्ड... आणि त्यानंतर गोव्यात दुसऱ्याच्याच नावाने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली... असे विविध कारनामे करत लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मिस्टर नटवरलाल ला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तराखंड येथील डोईवाला पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून एक कार, तीन दुचाकी आणि दहा वेगवेगळ्या नावांची बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहने व मोबाईलसाठी फायनान्स करून त्यांची विक्री तो करत होता.

एका वाहन तपासणीतून त्याचा हा सर्व खेळ उघड झाला. डोईवाला ग्रामीणचे पोलिस अधीक्षक कमलेश उपाध्याय यांनी सांगितले की, डोईवाला पोलिस गुरुवारी संध्याकाळी वाहनांची तपासणी करत होते. या वेळी नंबर प्लेट तुटलेली एक मोटरसायकल त्यांना दिसली.

तो क्रमांक ऑनलाइन तपासला असता, चेसीस क्रमांक वेगळा असल्याचे आढळून आले. ही मोटारसायकल दक्षित द्विवेदी याच्या नावावर होती.

त्याच्यावर संशय आल्याने त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवतात त्याने त्याचे खरे नाव ललित दत्तगतल असल्याचे सांगितले. तो धारचुला पिथौरागढचा रहिवासी आहे. लोक त्याला आदित्य म्हणून ओळखतात.

बनावट ओळखपत्र बनवून वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेऊन तो मोटारसायकल, स्कूटर आणि अनेक महागडे मोबाईल खरेदी करत होता. त्यानंतर या वस्तू तो इतरांना विकायचा.

त्याची बॅग तपासल्यावर त्याच्याकडे अनेक नावाची ओळखपत्रे सापडली. यापूर्वी त्याने टिहरी आणि देहरादून येथील पत्त्यांवर वित्तपुरवठ्यावर अनेक वाहने घेतली होती.

ललितविरुद्ध टिहरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून टिहरी पोलिसांनी त्याच्यावर पाच हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

गोव्यातून केला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स

आरोपीने वेगवेगळ्या नावाने अनेक कागदपत्रे तयार केली. यातील एका कागदपत्रानुसार त्याने रक्षित द्विवेदी या नावाने गोव्यातील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. यानंतर अनेक महिने तेथे कामही केले. त्यानंतर तो हल्द्वानीला आला. येथे त्याने मोबाईल शोरूम उघडले.

10 आधार कार्डे

आरोपीकडून 10 आधार कार्ड जप्त केली आहेत. यापैकी काही आदित्य सिंग या नावाने आहेत तर काही यशवंत सिंग या नावाची आहेत. आदित्य उपाध्याय, ललित जोशी, रक्षित द्विवेदी, रक्षित सिंग, ललित दुग्गतल, अक्षय जोशी आणि अक्षय सिंग या नावाचीही आधारकार्ड त्याच्याकडे होती.

तीन पॅनकार्ड

याशिवाय डेहराडून, टिहरी आणि आसाम येथून जारी केलेली तीन पॅनकार्डही त्याच्याकडे सापडले आहेत. त्या सर्वांची नावे वेगवेगळी होती पण फोटो मात्र त्याचा होता. एवढेच नाही तर त्याने रक्षित द्विवेदी आणि ललित दुग्गतल या नावांनी दोन पासपोर्ट केले होते. त्याच्याकडे चार विविध नावांचे ड्रायव्हिंग लायसन्सही होते.

आरोपीने हे सर्व त्याच्या हल्द्वानी येथील दुकानात बनवले होते. त्याच्याकडे एखादी व्यक्ती वस्तू खरेदी करण्यासाठी यायची तेव्हा त्याचे आधार कार्ड स्कॅन करून तो त्यात स्वतःचे नाव टाकायचा. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता.

त्याच्याकडे वेगवेगळ्या नावाच्या चार मोटारसायकलीही आढळून आल्या. पोलीस त्या जप्त करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT