PM Modi Dainik Gomantak
देश

"एकही देशद्रोही सुटणार नाही...", भारताच्या सुरक्षेला नख लावणाऱ्या 23 म्होरक्यांचा गेम ओव्हर! मोदी सरकारनं दिला मोठा दणका

Central Government UAPA Action Latest News: भारताच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या देशविरोधी शक्तींविरोधात मोदी सरकारने एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला.

Manish Jadhav

Central Government UAPA Action Latest News: भारताच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या देशविरोधी शक्तींविरोधात मोदी सरकारने एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला. सरकारने युएपीए अंतर्गत आणखी 23 जणांना 'दहशतवादी' म्हणून घोषित केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज (4 जुलै) या संदर्भातील अधिकृत गॅझेट नोटिफिकेशन जारी करुन ही माहिती दिली.

या जारी करण्यात आलेल्या नवीन यादीमध्ये प्रामुख्याने पाकिस्तानमधून कारवाया करणाऱ्या आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) तसेच लष्कर-ए-तैयबा (LeT) यांसारख्या धोकादायक दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या अनेक म्होरक्यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे सर्व 23 जण भारतात दहशतवाद्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, टेरर फंडिंग, शस्त्रास्त्रांचा पुरवठा, सीमापार घुसखोरी आणि विविध दहशतवादी हल्ल्यांचे कट रचणे यांसारख्या गंभीर देशविरोधी कारवायांमध्ये थेट सामील राहिले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या या 23 दहशतवाद्यांच्या यादीमध्ये प्रामुख्याने लष्कराच्या तळांवर झालेल्या हल्ल्यांमधील मास्टरमाइंड्सचा समावेश आहे. यामध्ये 2016 मधील नगरोटा लष्करी कॅम्पवरील हल्ल्याशी संबंधित घुसखोरीच्या नेटवर्कचा मुख्य चालक मुफ्ती मोहम्मद असगर खान याचा समावेश आहे. तसेच सुनजवा आर्मी कॅम्पवर 2022 मध्ये झालेल्या हल्ल्याचा कट रचणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद इलियास काश्मीरी आणि या हल्ल्यातील घुसखोरीचा मुख्य समन्वयक मोहम्मद मुसद्दिक या दोघांची नावेही या यादीत आहेत.

याव्यतिरिक्त, 2016 च्या नगरोटा हल्ल्यापूर्वी स्थानिक नेटवर्कशी संपर्क ठेवून दहशतवाद्यांची घुसखोरी करुन आणणारा हाफिज अब्दुल शकूर आणि नगरोटा हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणारा अब्दुल्ला जेहादी यांनाही दहशतवादी घोषित केले. लष्कर-ए-तैयबाचा लॉन्चिंग कमांडर फिरदौस अहमद भट आणि लष्कर व टीआरएफसाठी सीमापार कारवाया चालवून शस्त्रास्त्रांची पुरवठा करणारा बिलाल अहमद मीर उर्फ अहमद भाई याच्यावरही या कायद्यांतर्गत शिक्कामोर्तब करण्यात आले.

या कठोर कारवाईसाठी वापरण्यात आलेला युएपीए हा भारताचा अत्यंत कडक आतंकवाद-विरोधी कायदा आहे. देशाच्या सुरक्षेला आणि ऐक्याला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांवर लगाम लावण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो, ज्या अंतर्गत आता या 23 आरोपींना दहशतवादी (Terrorist) घोषित करुन त्यांच्या नेटवर्कला उद्ध्वस्त करण्याची तयारी सरकारने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

SCROLL FOR NEXT