Jagdeep Dhankhar Dainik Gomantak
देश

पश्चिम बंगालमध्ये खळबळ; रात्री 2 वाजता राज्यपालांनी बोलावले विधानसभेचे अधिवेशन

राज्यपाल जयदीप धनखर यांनी पहाटे 2 वाजता विधानसभेचे अधिवेशन बोलावून खळबळ उडवून दिली. टायपिंगच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे सभापतींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमध्ये टायपिंगच्या चुकीमुळे विधानसभेचे अधिवेशन रात्री 2.00 वाजता सुरू होणार आहे. वास्तविक, पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने विधानसभेचे अधिवेशन सुरू करण्यासाठी राज्यपालांना पाठवलेल्या प्रस्तावात 7 मार्च (सोमवार) 2 PM ऐवजी 2 AM टाईप करण्यात आले होते. आज राज्यपाल जगदीप धनखर यांनी दुपारी राज्याच्या मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलावले होते, मात्र उच्चपदस्थ अधिकारी हे राज्यपालांपर्यंत पोहोचले नाहीत. यानंतर राज्यपालांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र रात्री दोन वाजता अधिवेशन सुरू करण्याचा हा प्रस्ताव त्यांना अनैसर्गिक वाटत होता.

विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही टाईप मिस्टेक आहे. राज्यपालांना ती चुक दुरुस्त करता आली असती, पण त्यांनी रात्री 2.00 ही झालेली चुक मान्य केल्याने आता विधानसभेचे अधिवेशन हे रात्रीच सुरू होणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने पाठवलेल्या पहिल्या दोन नोट्समध्ये ते दुपारी 2:00 वाजता लिहिले होते, मात्र त्याठीकानी चुकिने पहाटे 2:00 पर्यंत केले गेले, राज्यपाल त्याकडे दुर्लक्ष करू शकले असते मात्र तसे झाले नाही. तथापि, पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज दुपारी 2:00 वाजता सुरू झाले, तर देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना असेल. असंही राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

गुरुवारी, राजभवनाच्या वतीने, मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारताना, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यघटनेचे कलम 174 अन्वये सोमवारी म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 2 वाजता (2 AM) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याचे सांगण्यात आले.

संसदेच्या रात्रीच्या अधिवेशनांतर पहील्यांदा होणार राज्याचे रात्रीचे अधिवेशन

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी राज्यपालांची खडाजंगी सुरू असतानाच राजभवनातून अशी असामान्य मंजुरी मिळाल्याने बंगालच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री संसदेचे अधिवेशन झाले आहे. मात्र त्याला एक वेगळे वळण होते, त्याला एक कारण होते. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (GST) लागू करण्यासाठी सरकारने 30 जून रोजी संसदेचे रात्रीचे विशेष अधिवेशन घेतले होते. 30 जूनच्या रात्री सुमारे 11 वाजता हे अधिवेशन संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाले होते. रात्री 12 वाजताच राष्ट्रपती आणि पंतप्रधान जीएसटीला औपचारिकरीत्या देशभरात लागू करण्या संदर्भात हे अधिवेशन बोलावण्यात आले होते.

सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री केव्हा झाले संसदेचे अधिवेशन?

- 14 ऑगस्ट 1947 : तेव्हा सेंट्रल हॉलला कॉन्स्टिट्यूशन हॉल म्हटले जात होते. देशाला स्वातंत्र्य मिळणार होते. त्या मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. सर्वात आधी वंदे मातरम गायले गेले. त्यानंतर राष्ट्रपती आणि मग पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचे भाषण झाले.

- 14 ऑगस्ट 1972 : भारतीय स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव (25 वर्षे) होता. यावेळी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. तेव्हा व्ही.व्ही. गिरी राष्ट्रपती होते आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.

- 14 ऑगस्ट 1997 : स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवानिमित्त (50 वर्षे) मध्यरात्री विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. तेव्हा देशाला पहिले दलित राष्ट्रपती लाभले होते के.आर. नारायणन. पंतप्रधान होते इंद्र कुमार गुजराल.

- 30 जून 2017 : रात्री सुमारे 11 वाजता हे अधिवेशन संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाले होते. रात्री 12 वाजताच राष्ट्रपती आणि पंतप्रधान होते. जीएसटीला औपचारिकरीत्या देशभरात लागू करण्या संदर्भात हे अधिवेशन बोलावण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT