Gold Silver Price Dainik Gomantak
देश

Gold Silver Price: सुवर्णवार्ता… सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! बजेटनंतर भाव उतरल्याने ग्राहकांची चांदी, जाणून घ्या आजचे नवे दर

Gold Silver Rate Today : जर तुमच्या घरात लग्नसराईची लगबग सुरू असेल आणि दागिने खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Sameer Amunekar

जर तुमच्या घरात लग्नसराईची लगबग सुरू असेल आणि दागिने खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी कपात झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या किमतीत दीड टक्क्यांची घसरण

आज सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात मोठी पडझड झाली. सकाळी १०:३५ वाजेपर्यंत सोन्याच्या भावात सुमारे २,२८९ रुपयांची म्हणजे १.५५ टक्क्यांची घट नोंदवली गेली.

या घसरणीनंतर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी १,४५,४६४ रुपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत ही घसरण गुंतवणूकदारांसाठी आणि सामान्य ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

चांदीचे दर

चांदीच्या किमतीत झालेली घसरण तर अधिकच धक्कादायक आहे. दोन दिवसांपूर्वी ४ लाख रुपये प्रति किलोच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेली चांदी आता थेट अडीच लाखांच्या जवळ आली आहे.

आज चांदीच्या भावात १८,३५५ रुपयांची (६.९१%) मोठी घट झाली असून, सध्याचा दर २,४७,२९७ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. चांदीच्या दरातील ही मोठी तफावत पाहून बाजारपेठेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दर का कोसळले? प्रमुख कारणे:

बाजार तज्ज्ञांच्या मते, या घसरणीमागे तीन ते चार प्रमुख कारणे आहेत:

  • बजेटचा परिणाम: अर्थसंकल्पात सीमा शुल्कात कपात होईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. उलट, एसटीटी (STT) आणि कर नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • नफा वसुली: गेल्या वर्षात सोन्याने ७५% आणि चांदीने १६७% पर्यंत नफा दिला होता. आता गुंतवणूकदार आपला नफा सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत.

  • डॉलरची मजबूती: अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य धोरणांमुळे डॉलर इंडेक्स वधारला आहे. जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाला की सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी होतात.

खरेदीदारांसाठी उत्तम वेळ

तांत्रिक चार्टवर सोने आणि चांदी 'ओव्हरबॉट' झोनमध्ये होते, म्हणजेच त्यांची गरजेपेक्षा जास्त खरेदी झाली होती. आता किंमत खाली आल्यामुळे ही वेळ खरेदीसाठी उत्तम मानली जात आहे. मात्र, बाजारातील चढ-उतार पाहता तज्ज्ञांचा सल्ला घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT